महत्वाचे विभाग

Visit Here

Pages

Saturday, July 4, 2020

चारोळ्या

चारोळ्या

लग्न टिकविण्यासाठी वाढत्या ...Marathi novels story | घटस्फोट भाग :- १३
शेजाऱ्यावर प्रेम करता करता
घरच्यांना पुरेपूर विसारतोय
शेजाऱ्यांचं प्रेम पाहून
मनातल्या मनात झुरतोय






तरच महिलेला मिळणार पोटगी ! | News - News18 ...  causes of divorce | Loksatta
गंमत म्हणून मी एकदा
टीव्ही वर मालिका पाहिलेली
नवरा बायको म्हणून राहण्यापेक्षा
घटस्फोटाची संख्या वाढलेली




जागो हिंदू जागो क्या हिंदू होना ...
जे जन्मतःच असतात योगी
त्यांचं जीवन त्यागी
ज्यांची रीत असते भोगी
ते कायम राहतात रोगी

Baba Cartoon Images, Stock Photos & Vectors | Shutterstock

अपेक्षा भंग होईल म्हणून
वेदना मनाची मनात दाबली
वेदना मनात दाबत राहिलो
अन आठवण मात्र ताजीच राहिली.
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही...Marathi moral-inspiring story | parijatak | पारीजातकPin on Boys
तुझी केविलवाणी नजर
अनेकदा भिरभिरली दयेसाठी
मी कशी देऊ भिक्षा
मी भटकतो पोटासाठी


Try This Effective Solution To Remove Nazar Dosh - आजमाएं ...








जीवन जगायचं असेल तर
मरणाची भीती बाळगू नये
मरणच पत्करायचं असेल तर
जगण्याची धडपड करू नये ...

Five Character Appears In Both Ramayana And Mahabharata - पांच ...          Baahubali 2: The Conclusion movie review (2017) | Roger Ebert





गळणारा मोहर
गळायचा कधी थांबत नाही
गळणार आहे म्हणून
यायचा देखील राहत नाही.
आंबा मोहोर जपा! |








सवतपणाच्या वागणुकीला
बायको सुद्धा घटस्फोट देते
कितीही पुरुषार्थ असला तरी
निम्मा वाटा हिसकावून घेते.
पत्नीने नवऱ्याला आसाराम म्हणून ...पती भांडण करत नाही, त्याच्या ...







संमेलनात एकच प्रश्न
कविता केली सीमाची
ऐकली अन मन हळहळले
पण झाली नाही दमाची










डोळ्यात मिळते
जेव्हा अश्रूंना वाट
त्याच्याही अगोदर
चिंबतात यातना दाट
        










पाऊसही आता येईना
कारण तो फितूर झाला
पवनचक्कीच्या नावाखाली
रडारची वाट पाहू लागला








 नाटकातली उंदरं कशी
राजासारखी वाटतात
मांजराची चाहूल लागता
बिळात पळत सुटतात..







  बऱ्याच भावना विस्कटल्या तर
 त्याही एकवाटतात
 एकवटलेल्या भावनानांना मग
 कधीतरी कोंब फुटतात









पिवळ्याधामक माळरानावर
करंजला पालवी फुटली
मला काही कळेना
ही जगण्याची जिद्द कुठली ?



तू कोणाचीही नव्हतीस
तेव्हा वाटायचं तू सर्वांची आहेस
आता मात्र एकट्याची आहेस
हे कायमचं विसरायचं नाहीस




 उच नीच न कोणी
सरस्वतीच्या दारात
ज्याचे त्याचे फळ मिळो
ज्याच्या त्याच्या पदरात





मध्यरात्रीचा दीर्घ श्वास
कानामागे जाणवला
तेव्हाच माझा आनंद
पुन्हा एकदा दुणावला





Sick Corona GIF by Camdelafu

जे शाळा सोडुन 
मुंबईला पळाले
त्यांना कोरोनाने
पुन्हा शाळेत बसवले 

Sick Emoji GIF by SportsManias

चूकतो तो माणूस आणि
पुन्हा चूक करतो तो वेडा माणूस ,
जो स्वतःच्या नाही तर ,
दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... 



अभिमानाने सारी
लहान राहिली
कारण स्वाभिमान विकून
बाकीची मोठी झाली




पुन्हा अभिमानाने 
आम्ही लहानच राहिलो
कारण पूर्वी स्वाभिमान विकून 
मोठं झालेलो


रुळलेल्या पायवाटेवरून
सारेच चालतात
यशासाठी धडपडणाऱ्यांना
अनेक वाटा मिळतात


जमाना बदलला
सारेच बदलले
Hard work   गेले
अन Smart work आले  



अनेक उन्हाळे खाऊन
रोपट्याचा वटवृक्ष होतो
जिथं झाडांची वाणवा
तिथं एरंड वृक्ष होतो 



घरातलं भांडण 
लोक ऑफिसात सांगतात
शिकूनसुद्धा लोक 
अडाणीच वागतात



दुरावलेली मने
एकमेकांना प्रेम मागतात
शेवटी आपलीच कथा 
मनाला सांगतात 


पावसाने चिखल झाला
थोड्यावेळाने सुकला
नंतर वाळला
शेवटी धुरळा उडाय लागला 




दूषित हवा ,
दूषित पाणी 
खरं सांग देवा 
कुणाची करणी ?



तुका युगाची वारी करी
संगे अलंकापुरी
कोण थकले जिवा 
भेटीन रे केशवा



चारोळ्या 2

ज्याचा त्याचा धर्म
प्रत्येकाने पाळला पाहिजे
इतरांचा नाही
पण स्वतःचा धर्म कळला पाहिजे.



प्रत्येक धर्माभोवती
दलालांचे वेटोळे आहे
दलालांच्या स्वार्थामुळेच
प्रत्येक चांगल्या धर्माचे वाटोळे आहे .


फुटाफुटीच्या वादात
' राज ' कारण नडलं
मंत्री झालो नाही म्हणून
उदघाटन अडलं



मी बंडखोर
फौज माझी बघा
फौजेईतकी मोठी
मला हवी जागा


एकामागून एक किल्ले घेत
दिल्लीला निघाला
दख्खनचा राजा मात्र
महाराष्ट्रात अडकला



काट्याने काटा काढायचा जमाना
आता कालबाह्य झालाय
बॉम्बला उत्तर द्यायला
कोरोना व्हायरस आलाय



लग्न झाल्यावर म्हणतात
बसते संसाराची घडी
कारण बायकांना मिळतो
आयुष्यभर चाकरीचा गडी




केवळ विचाराने भरत नाही
माणसाचं पोट
त्यासाठी आठवावं लागतं
रक्त घोट न् घोट




जगण्यासाठी हवा
सर्वांनाच पैका
त्यासाठी प्रत्येकजण म्हणतो
माझं ते ऐका

No comments:

Post a Comment

thank for ur valuable comment