महत्वाचे विभाग

Visit Here

Pages

Saturday, October 2, 2021

वर्णविचार



✔️* वर्ण :-


बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात. 

ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.


✔️बोल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत  त्यांना 'ध्वनी चिन्हे' किंवा 'अक्षरे' असे म्हणतात. 


✔️मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत.


👉*वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत. 


▪️१) स्वर

▪️२) स्वरादी 

▪️३) व्यंजने


👉  स्वर


🔸* स्वर :-


✔️१] ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना 'स्वर' असे म्हणतात.

✔️२] या वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात. 

✔️३] स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

✔️४] स्वर म्हणजे नुसता सुर.


🔹* स्वरांचे प्रकार-


▪️अ] उच्चारावरून पडणारे दोन प्रकार


✔️१) ऱ्हस्व स्वर :- ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना 'ऱ्हस्व स्वर' म्हणतात.

उदा. - अ, इ, उ, ऋ, ऌ 

   

✔️२) दीर्घ स्वर :- ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.

उदा. - आ, ई, ऊ 


▪️ब] उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार


✔️१) सजातीय स्वर :- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण. 

उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ 


✔️२) विजातीय स्वर :-भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण. 

उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ


👉 स्वरादी


▪️* स्वरादी :-


✔️१] ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो, 

त्यांना स्वरादी म्हणतात. 

उदा :-अं, अ: 


✔️२] अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.


✔️३] यात अनुस्वार (._) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.


✔️४] अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या  वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.

No comments:

Post a Comment

thank for ur valuable comment