आपण २०२१ मध्ये दहावी पास झाला आहात तर आपल्याला ११ मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म कसा भरावा त्याचबरोबर फॉर्म लिंक कोणती आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे.
महाराष्ट्र CET अर्ज परीक्षा दिनांक
CET अर्ज सुरु दिनांक :- 20 जुलै २०२१ पासून सकाळी ११ नंतर
CET परीक्षा दिनांक :- २१ ऑगस्ट २०२१
दहावीचा निकाल नुकताच १६ जुलै रोजी लागला असून हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. हा निकाल लागल्यानंतर आपल्याला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी CET परीक्षा द्यावी लागते . हि परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे. तसेच आपल्याला हि परीक्षा द्यायची आहे कि नाही हे वेबसाईट वर माहिती द्यावी लागणार आहे. तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८ /- रुपये भरावे लागणार आहे.
परीक्षा शुल्क
महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे.
इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८/- रुपये भरावे लागणार आहे.
अर्ज कुठे भरावा
फॉर्म प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थी महाविद्यालयीन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करू शकतात. यानंतर, त्यांच्याकडे या साठी उपस्थित राहण्याचे किंवा न येण्याचे पर्याय त्यांच्याकडे असतील. त्यांना पाहिजे ते निवडू शकतात.
अर्ज येथे करा
वेबसाईट
व्हिडीओ पाहण्यासाठी