- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी
रियाज आतार |
कोविड 19 अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 16 मार्च 2020 पासून खासगी शाळा सहित जि. प.च्या शाळा देखील बंद आहेत . शासनाने इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सत्र 2 च्या परीक्षा रद्द केल्या आणि आकारिक मूल्यमापनावर आधारित 100 पैकी रूपांतरण करून वार्षिक निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले . सर्व शाळांनी निकाल तयार केला परंतु 3 मे 2020 पर्यंत दुसरे लॉक डाऊन असल्याने सोशल डिस्टनसिंग पाळता येत नसल्याने शाळांनी शाळेत निकाल जाहीर केले नाहीत . तथापि शासनाने ऑनलाईन निकाल जाहीर करावेत असे सुचवले .जि प.शाळा काराजनगी (ता-जत, जि-सांगली ) येथील हरहुन्नरी ,अष्टपैलू, उत्साही, गुरुमित्र आणि तंत्रस्नेही शिक्षक मा.श्री. रियाज रजाक अत्तार सर यांनी सॉफ्टवेअर मध्ये निकाल तर बनवला, त्याच सॉफ्टवेअर च्या फाईल्स अपलोड करून लिंक वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तो निकाल सध्या सर्व पालक ऑनलाईन पाहू शकतात, प्रिंट काढू शकतात.सदर निकालाच्या हार्ड कॉपी शाळा सुरू होताच पालकांना उपलब्ध करून दिल्या जातील .असे शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.आण्णाराव पाटील सर यांनी सांगितले .
या वर्षीचा पाल्यांचा निकाल ऑनलाईन पाहून पालक भलतेच खुश झलेले आहेत.ग्रामस्थ ,पालक, SMC अध्यक्ष सर्व सदस्य हे मोठ्या उत्साहाने मोबाईलवर आपल्या पाल्याचा रिझल्ट (निकाल ) पाहून आनंद व समाधान व्यक्त करत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री आण्णाराव पाटील सर आणि SMC अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी आत्तार सरांचे विशेष कौतुक केले .अत्तार सरांचे पालकांमधून देखील अभिनंदन आणि कौतुक होत आहे ...........
आपल्या सेवेत सदैव तत्पर
कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे आपल्या मुलाचा वार्षिक निकाल आपल्याला पाहता आला नाही, तरी तो आपल्याला घरबसल्या पाहता यावा याकरता आपल्या शाळेने आपणासाठी ऑनलाईन रिझल्ट पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
त्याकरता खालील प्रमाणे कृती करा.👇
1.खाली दिलेल्या निळ्या लिंकला टच करा*
2. आपल्या शाळेचा यु डायस 27350205001 नोंद करा
3. आपल्या मुलाची इयत्ता व तुकडी अ भरा.
4. आपल्या मुलाचा शाळेतील हजेरी क्रमांक अचूक नोंदवा.(माहितीसाठी फोटो दिला आहे)
5. आपल्या मुलाचा शाळेमध्ये रजिस्टरला नोंद असलेली जन्मतारीख अचूक नोंदवा
6. शेवटी खाली *submit* *या बटनाला टच करा
7. सबमिट बटन आला टच करताच आपल्या मुलाचा निकाल पीडीएफ स्वरूपातही मिळू शकेल.
8. फक्त निकाल पाहायचा असल्यास submit self या बटनाला टच करा
घर बसल्या आपल्या मुलाचा प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रचा निकाल पहा.
*उदाहरणा दाखल पहा*.👇
पौर्णिमा बाबासो गायकवाड
Udise 27350205001
इयत्ता आठवी तुकडी अ
हजेरी क्रमांक 21
जन्मतारीख 11/01/2007आपल्या मुलांचा हजेरी क्रमांक आणि जन्मतारीख जाणून घ्यायची असेल तर हे पहा
आपल्याच सोयीसाठी आपलाच
गुरुमित्र रियाज आतार
मस्त असेच लिहीत राहू .......
ReplyDeleteVery good job sir I like it............my school enter in to the online communication...as well as digital.
ReplyDeleteमस्त रे भावा
ReplyDeleteNice work sirji
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteलय भारी दादा
ReplyDeleteGood job sir
ReplyDeleteआताच्या शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे कमीच
Thanks to all
ReplyDeleteGraet work sir
ReplyDeleteVery good sir I proud of you and your staff.
ReplyDeleteGood work hats off Brother 💐👌💐
ReplyDeleteNice work. Best of luck ahead.💐
ReplyDeleteThank you all of you
ReplyDelete