कोरोना पासून गाव कसा वाचवायचा ?
जीवघेणा विषाणू |
गावी येणाऱ्या मुळ नागरीकांनी खालील गोष्टी पाळायलाच हव्यात,
तरच कोरोना व्हायरस चा प्रसार नक्कीच थांबेल.
फक्त quarantine सेंटर सज्ज आहेत
परंतु quarantine सेंटर मध्ये जाण्यास सांगितले जाते पण् कुणी ही जात नाही
आपल्या भोळ्या-भाबड्या आणि कष्टाळू गावकऱ्यांना वाचवण्यासाठी एवढ जरूर करा.नाहीतर त्यांनी विश्वास आणि प्रेमाने आपल्याला गावात दिलेला आसरा त्यांच्याच जीवावर बेतला तर यापुढे कोणीही तुम्हाला थारा देणार नाही.हि भोळी माणस मनाने खूप मोठी आहेत त्यांचा मोठेपणा त्याच विश्वासाने कायम ठेवा. आपल्या आयुष्यातील १४ दिवस एकटे राहिला तर जास्त नुकसान होणार नाही पण ह्या जगाचा पोशिंदा बाप जर कोरोनाने ग्रासला तर तुम्ही उपाशी जरूर मरालं.
म्हणून
शहरातून येणाऱ्यांना हात जोडून विनंती
- 👉चोरासारखे नका येऊ.
- 👉 राजरोसपणे या.
- 👉गाव आमच तुमच सर्वाचे आहे,तुम्ही नियम पाळा, नक्कीच तुमचे स्वागत आहे
- 👉फक्त १५ दिवस अलगीकरण पाळा (कोरंनटाईन रहा)
- 👉अगदी घरातील कोणालाही स्पर्श करु नका, वस्तू एकत्रित वापरु नका.
- 👉तुम्हाला किराणा, भाजीपाला, धान्याची गरज पडली तर फोन करुन सांगा, किंवा लांबूनच हाका मारा
- 👉अलगीकरणात राहीले म्हणजे गावातील लोंकाना तुमचा अभिमानच वाटेल
- 👉तुम्ही अलगीकरणात ( कोरंनटाईन) राहीले तर तुम्हाला हवी ती मदत गावकरी करतील, अगदी पैसे नसले तरी.
- 👉तुम्ही गावाची व गावकऱ्यांची अलग राहुन काळजी घ्यावी, गावकरी तुम्हाला नक्कीच मदत करतील
- 👉लोकांत फिरुन आपला आपमान करुन घेऊ नका, गावाचे जबाबदार नागरीक बना.
- 👉 आपल्याकडे किंवा शेजारच्या कडे बाहेरगावाहून कोणी आले तर लगेचच गावात सर्वांना कळवा.
- 👉 भल्या भल्याना कोरोना झाला व त्याने मृत्यू झाल्याचे दिसून येते आहे, आपला पाहुणा किंवा बाहेर गावावरून येणारा घरातील सदस्य यांना करोना होणारच नाही हा वेडपट पणा डोक्यातून काढून टाका.
- 👉 बाहेरगावाहून येणारा किंवा अनोळखी व्यक्ती ला कोरोना झालाय असे समजूनच काळजी घ्या.
- 👉लहान गावात ग्रामपंचायत कार्यालय किंवा, तेथील सार्वजनिक सभागृह,शाळा मध्ये सोय करण्याची मागणी हे करताना शासनाचा एक रुपया खर्च होणार नाही, कारण बाहेर गावावरून आणि शहरातून येणारे लोक स्थानिक असल्याने,त्यांचे घरातील लोक त्यांची जेवणाची,नाश्त्याची सोय करतील.
या गोष्टी चे पालन केले तर करोना व्हायरस आपल्या गावात प्रवेश करूच शकणार नाही.
आपला गावतरी वाचवा. ही कळकळीची विनंती
हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नसून केवळ कोरोना या वैश्विक महामारीविषयी जागरूकता पोहोचवणे हा आहे. कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…🙏
आपल्या सारखाच एक सामान्य गावकरी
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.
आणखी लेख वाचवायचे असल्यास खालील ब्लॉग ला नक्की भेट द्या.
https://riyajatar12.blogspot.com
😷😷😷
नियम पाळा
कोरोना टाळा
सामाजिक व शैक्षणिक साठी अति उत्तम ब्लॉग आहे सर..
ReplyDeleteअगदी योग्य,
ReplyDeleteमस्त. सर्वांनी हे पाळले पाहिजे.
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteछान
ReplyDeleteखूप छान माहिती सर, प्रत्येकाने आपण सांगितलेले नियम पाळले तर नक्कीच corona cha प्रसार थांबेल.
ReplyDeleteहो मेहुणे😊👍
Deleteछान, अनुकरणीय माहिती
ReplyDeleteअच्छी बात है।अपना और अपनों का खयाल रखना ये अपने हातो मे ही है।
ReplyDeleteहिंदी या इंग्लिश मे बनाके भेज देना।
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteछान
ReplyDelete