उपळाई बुद्रुक - कशी घडली अधिकाऱ्यांची पंढरी-१।
✍️भाग - १
गावाचे मुख्य प्रवेशद्वार |
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यापासून दक्षिणेला माढा-मोडनिंब रोडवर 7 किलोमीटर अंतरावर असलेले सुमारे दहा हजार लोकवस्तीचे,पूर्वी गट ग्रामपंचायत असणारे गाव आता पंधरा ग्रामपंचायत सदस्य असलेले गाव झाले आहे.
पूर्वेला अंजनगाव, ईशान्येला उपळाई खुर्द,उत्तरेला माढा, वायव्येला चिंचोली, पश्चिमेला रोपळे खुर्द व बावी,आग्नेयेला वाफळे तर दक्षिणेला वडाची वाडी हि गावे आहेत.
आपल्या मातीतील अलौकिक बुद्धिमत्तेने देशात प्रसिद्धीला आलेले, एक यशस्वी परंपरा लाभलेलं गाव त्यामुळेच उपळाई बुद्रुक ला स्पर्धा परीक्षेची पंढरी म्हणून नावलौकिक मिळाला आहे.
विशाल वटवृक्ष |
माढया वरून मोडनिंब ला जाताना उजव्या बाजूला रयत शिक्षण संस्थेच्या नंदिकेश्वर विद्यालयासमोरील आणि डावीकडील सरळ वाटेने गेले की ओढ्याच्या बाजूलाच असणाऱ्या विशाल वटवृक्षाला पाहिले कि गावाचे वैभव दिसून येते. गावाच्या वेशीजवळ असणारे हनुमान मंदिर ,गावाची तहान भागवणारी दगडी बांधकामातील गावविहिर तर गावाच्या वैभवात आणखीनच भर टाकते. गावाच प्रवेशद्वार म्हणजे भरभक्कम रायगडाच्या प्रतिकृतीचे बुरुज, जणू शिवरायांच्या अस्मितेची आणि शिकवणीची जाण दाखवून देतात. प्रवेशद्वारावर असलेली अश्वारूढ शिवरायांची प्रतिमा गावाच्या वैभवशाली आणि एकात्मतेची झलकच दाखवून देते.
मुख्य रस्ता |
प्रवेशद्वारापासून सरळ जाणारा रस्ता म्हणजे गावातील पूर्वजांच्या दुरदृष्टीकोनाचे एक मूर्त उदाहरणच म्हणावे लागेल.कारण हा मुख्य रस्ता गावाच्या बरोबर मधून जातो.कोणत्याही लोकवस्तीमधून येणाऱ्या प्रत्येक रस्त्याला हा सामावून घेतो. या रस्त्याने गावाचे दोन समांतर भाग झाल्याचा भास होतो.रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकाने गावकऱ्यांची मनोभावे सेवाच करतात.गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या चौकास क्रांती चौक असे नाव आहे.गावात आठवडी बाजार होत नसला तरी दररोज सकाळी शेतकरी आपापल्या कष्टाच्या घामाने पिकवलेला भाजीपाला विकण्यासाठी याच चौकात येतो आणि सर्व गावकरीही ते खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करतात. गावात कोणतीही राजकीय सभा, सत्कार,सन्मान, आंदोलन, मोर्चा,सहविचार सभा, सार्वजनिक शिवजयंती, अहिल्याबाई होळकर जयंती,गणेशोत्सव, मिरवणूक हे सगळं याच चौकात.
फाईट for Tea lover |
चौकातील मैत्री दृढ करणारं ठिकाण म्हणजे हॉटेल.एकमेकांना हक्कानं फाईट (चार अर्धा कप चहा) मागण्यात एक वेगळ नातं जाणवतं.चहाचा घोट घेता घेता एकमेकांचं सुख दुःख वाटून घेणारे गावकरी पहिले कि शहरातील स्वर्गसुखही फिकी वाटतात.
गावात हिंदू मराठा, मुसलमान, माळी, चांभार ,महार, मांग, चांभार,कोष्टी, कुंभार, नाभिक, ढोर, वाणी,ब्राह्मण, डवरी, गोसावी, कासार, वडार, सोनार, धनगर , परीट, गुरव,जैन,गुजर ,कोळी, जंगम यांसारख्या वेगवेगळ्या जाती धर्माची लोकं गुण्यागोविंदाने राहतात.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समाजाचे लोक आजही आपापल्या समाजाच्या समुदायानेच एकत्र राहतात.अगदी ठरवून नाही पण एक वैशिष्टय प्रत्येक जातीच्या स्वतंत्र गल्ल्या.कोणत्याही सामाजिक व राजकीय भेदभावाशिवाय एकोप्याने राहतात.
अखंड शिवनाम सप्ताह |
गावात दत्त जयंती ,हनुमान जयंती, रामनवमी, महाशिवरात्री, हरिनाम सप्ताह, अखंड शिवनाम सप्ताह ,मोहरम , रमजान ईद यांसारखे धार्मिक समारंभ उत्साहात साजरे केले जातात. तर शिवजयंती , गणेशोत्सव , अहिल्याबाई होळकर जयंती, आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, रोहिदास जयंती यासारखे सामाजिक कार्यक्रमही आयोजित होतात.
गाव भाग मोठा असला तरी शेती आणि पशुपालनाच्या हेतूने मासोबाचीवाडी ,गावडे वस्ती, कदम वस्ती , गुंड वस्ती, बोकडदर वाडी,भांगे वस्ती ,बेडगे वस्ती ,गायकवाड व झोडे वस्ती, माळी वस्ती, मांजरे वस्ती, बाबर वस्ती, दुचाळ वस्ती, चव्हाण वस्ती यासारख्या वस्त्या ह्या जणू गावाला गस्तच घालत असल्यासारख्या चाहुबाजूनी रक्षण करतात.या वस्त्यावरील लोक शेती व दूधाचा व्यवसाय करुन आपली उपजीविका करतात.
अधिकारी घडवणारे ज्ञानमंदिर
गावात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक सहा तर इतर दोन माध्यमिक शाळा आहेत. याच बरोबर सुमारे दहा अंगणवाड्या ही आहेत.तर शारीरिक बालोपासनेचे धडे देणारी व्यायामशाळाही आहे.
यासोबतच मुक्या जीवांना जीवनदायिनी देण्यासाठी प्राध्यापक विजयकुमार शेटे (आप्पा) देशी गायींसाठी गोशाळा तर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते हे अरिंजय गो शाळा चालवत आहेत.
मैत्रेय संवाद ग्रुप |
हॉलिबॉल व शंकर शेलार प्रतिष्ठान |
हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नसून केवळ गावाबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यातून कुणाचा उल्लेख राहून गेला असल्यास अथवा कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…🙏
आपल्या सारखाच एक सामान्य गावकरी
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
पुढील भागात गावाची यशस्वी वाटचाल व सांस्कृतिक परंपरा वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट
हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.
आणखी लेख वाचवायचे असल्यास खालील ब्लॉग ला नक्की भेट द्या.
https://riyajatar12.blogspot.com
असेच लिहीत रहा.......
ReplyDeleteलेखन उत्तम होत राहील .गावातील प्रत्येक अधिकाऱ्यांची माहिती स्वतंत्र लेखात लिहा ....
खूप सुंदर लेख.
DeleteSuperb sir
DeleteHo nakkich lohinar ahe
ReplyDeleteNice. Carry on
ReplyDeleteThanks
DeleteIts really nice.. Keep it up
ReplyDeleteखूप छान, आपल्या गावाचे नाव इंटरनेटच्या माहिती जंजाळात जगाला माहिती होईल. उत्तम विचार आहेत असेच सर्वोत्तम लेख सर्वांना वाचनास मिळावेत. ग्रामदैवत नंदिकेश्वर आपणास विचाराचे सामर्थ्य देवो हीच सदिच्छा.
ReplyDeleteThank you
Deleteलेख लिहिण्याचा उद्देश गावाबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे खूपच छान असेच लिहीत रहा...
ReplyDeleteThank you
Deleteछान.असेच लिहीत रहा.
ReplyDeleteअतिशय सुंदर आणि अलंकारिक शब्द रचना। लिहीत रहा।
ReplyDeleteMitra Riyaj Great Job!
ReplyDeleteBest of Luck For ur Bright Future
Thank you
DeleteTumachya premane tumach suruvat🙏
रियाज सर आपण जी मांडणी केलीत ती खरंच खूप छान आणि सर्वसमावेशक आणि गावाचे वास्तव मांडणारी आहे, आपण आमचे मित्र आहात आणि नंदिकेश्वर विद्यालयाचे उत्कृष्ट विदयार्थी ते आदर्श शिक्षक ते उत्तम मित्र आपण लिहीत राहावे कोणताही संकोच न करता , आपण आपल्या गावची ओळख खूप सुंदर आणि वास्तव मांडत आहात आपणाला शुभेच्छा
ReplyDeleteThank you
DeleteUpalai pahayachi ichha hotey. Nice article.
ReplyDeleteAlways welcome
Deleteअतिशय उपयुक्त माहिती छान उपक्रम पुढील माहिती साठी शुभेच्छा
ReplyDeleteThan you
ReplyDeleteआपल्या गावाचं वर्णन वाचून आपल्या गावच पाहत आहे
ReplyDeleteअसे वाटले . पुढील भाग वाचनाची उत्सुकता लागली आहे
Great sir... Best of luck for your future🙏💐
ReplyDeleteNice sir
ReplyDelete🙏
DeleteGood job sir .....
ReplyDelete👍
DeleteGood job sir .....
ReplyDeleteरियाज सर उत्कृष्ट लेखन धनगरवाडी च्या ऐवजी बोकडदर वाडी असे नमूद केले असते तर बरं वाटलं असतं आपण केलेले लेखन वाचून आपलं गाव आठवलं थँक्यू असंच लेखन करत जावा बेस्ट ऑफ लक
ReplyDeleteनक्कीच बदल करेन
Deleteपुढील लेख नक्की वाचा
धन्यवाद
बदल केला आहे👍
Deleteसुचवलेला बदल केला आहे गावडे साहेब👍
ReplyDeleteKhupch sundar
ReplyDeleteThank you
Deleteथँक्यू पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
ReplyDeleteअशाच सूचना करत जा आणि पाठीशी शुभेच्छाही असू द्या दुसरा भाग लवकरच लिहीन आपला whatsaap no पाठवा
DeleteMy no 9922148732
सर्वांचे मनःपूर्वक आभार🙏
ReplyDeleteVery Nice... Keep it up
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteVery Very Nice Guru.Keep it Up
ReplyDeleteरियाज सर लय भारी काम .उत्कृष्ट लेखन .आणि खूप खूप शुभेच्छा!
ReplyDelete💯👍
ReplyDeleteलय भारी रियाज, शब्दरचना ,वाक्यरचना,आणि गावातील एक ना एक ठिकानाची आणि त्याच्या वैशिष्ठयाची खूप सुंदर रचना केली आहे.खरच अप्रतिम अप्रतिम आहे हे
ReplyDeleteThank you
DeleteVery good sir
ReplyDeleteVery good sir
ReplyDeleteसुरुवात चांजली,अधिकाधिक दर्जेदार, वाचनीय व सत्य माहिती वाचण्यास मिळावी
ReplyDelete👍 प्रयत्न असेल
Deleteलय भारी रियाज, शब्दरचना ,वाक्यरचना,आणि गावातील एक ना एक ठिकानाची आणि त्याच्या वैशिष्ठयाची खूप सुंदर रचना केली आहे.खरच अप्रतिम अप्रतिम आहे हे. अभिमान वाटतो की, मी उपळाई गावचा रहिवा आहे़.(सावंत वस्ती चा उल्लेख केला असता तर आजून छान वाटलं असतं सर)
ReplyDelete👍
DeleteNice
ReplyDeleteछान रियाज
ReplyDeleteअतिशय सुरेख वर्णन केले आहे..... रियाज ने केलेले वर्णन वाचताना मुंबईत असूनही उपळाई गावातून फेरफटका मारल्याचा भास झाला....
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख Hats off Riyaj and Miss you Uplaikar
Regards,
Anil Shelake
Police Sub Inspector
Mumbai Police
अतिशय सुरेख वर्णन केले आहे..... रियाज ने केलेले वर्णन वाचताना मुंबईत असूनही उपळाई गावातून फेरफटका मारल्याचा भास झाला....
ReplyDeleteअतिशय सुंदर लेख Hats off Riyaj and Miss you Uplaikar
Regards,
Anil Shelake
Police Sub Inspector
Mumbai Police
धन्यवाद या पुढचा भागही नक्की वाचा
Deleteतुमच्या शुभेच्छा अशाच राहू द्या
.🙏🙏
ReplyDeleteNice mitra
ReplyDeleteअसेच लिहीत जा
तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूपच छान शब्दांकन...
ReplyDeleteखूप छान अत्तार सर
ReplyDeleteSuperb
ReplyDeleteसर खूप छान लेख लिहिला आहे
ReplyDelete🙏 खरोखर खुप छान लिहिले आहे सर,वाचुन खुप आनंद झाला. धन्यवाद 👍👍🙏 🙏 .
ReplyDeleteखूप छान लिहिले
ReplyDeleteSuper .......👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteब्लॉग खूपच छान झाला आहे सर ,
आता आपण फक्त लिहीत गेले पाहिजे ...👌👌👌👌👌👌👌
खूपच छान मराठी माहिती धन्यवाद.
ReplyDelete