उपळाई बुद्रुक- कशी घडली अधिकाऱ्यांची पंढरी
भाग 2 वाचण्यापूर्वी भाग - १ वाचायचा असल्यास खालील निळ्या लिंकला टच करा आणि नंतर हा भाग -२ वाचा
https://riyajatar12.blogspot.com/2020/04/blog-post.html
✍️ भाग -2
https://riyajatar12.blogspot.com/2020/04/blog-post.html
✍️ भाग -2
दुष्काळाच्या गर्तेत गाव जरी असला
तरी ज्ञानाचा व बुद्धिमत्तेचा सुकाळ निश्चितच आहे
विहिरीनी पाण्याविना तळ गाठले असले तरी
ज्ञानाच्या जलकुंभा मधून बुद्धिमत्तेचे अविरत झरे वाहतात
उपळाईतील अधिकारी संख्या खूप असून ते वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर आपली सेवा देत आहेत.या सर्व अधिकाऱ्यांच्या यशाचं गमक म्हणजे इथली आदर्श शिक्षण व्यवस्था तर मग वाचा कसे आहे गावातील शिक्षण.
अधिकारी रत्न |
उपळाई बुद्रुक मध्ये जन्मलेल्या आणि आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आपल्या गावाचे नावलौकिक सर्व देशभर करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या स्पर्धा परीक्षेतील निवडीने उपळाई बुद्रुक ला स्पर्धा परीक्षेची पंढरी म्हणून ओळखले जाऊ लागले .या स्पर्धा परीक्षेच्या पंढरीचा जन्म येथे असणाऱ्या शिक्षणाच्या तळमळीने झाला. म्हणतात ना, "Necessity is the mother of invention" म्हणजेेेच, "गरज ही शोधाची जननी असते", या उक्तीप्रमाणे पाऊस पाण्याशिवाय असलेली जिरायती शेती, त्यामध्ये कुठलाही उत्पन्नाची शाश्वती नाही, दिवसेंदिवस शेतीवर वाढत जाणारा घरातील व्यक्तींचा भार आणि यातूनच निर्माण झाली ती नोकरीची गरज, शिक्षणाची भूक
रडू तर येत होतं पण डोळ्यात मात्र ते दिसत नव्हतं
चेहरा कोरडा होता पण मन मात्र भिजलं होतं
कारण डोळे पाहणारे बरेच असतात
पण मन जाणणारे खूप कमी असतात
गावातल्या लोकांची ही गरज ओळखली ती अशाच काही लोकांनी ती लोक म्हणजे आपल्या गावामध्ये तळमळीने शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्याचे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकांनी. ते शिक्षक म्हणजे अगदी अंगणवाडी ते अधिकारी घडेपर्यंतच्या प्रवासात शिकवणारे सर्वच आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा यांनी दिलेले गुणवत्तापूर्ण शिक्षण.
आज पर्यंत घडलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा जेथून केला त्या अंगणवाडीच्या शिक्षिका म्हणजे चंपावती भगवान जाधव सर्वजण त्यांना आदराने चंपाबाई म्हणतात. खूप गरीब परिस्थितीत जन्मलेल्या. दहावीपर्यंतचं शिक्षण गावांमध्येे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी पंढरपूरात सखुबाई कन्या बोर्डिंगमध्ये प्रवेश घेतला मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे पन्नास रुपये फी भरणे देखील त्यांना शक्य नव्हतं.त्यामुळे त्यांना अगदी एका महिन्यामध्येच घरी परतावं लागलं.घरी अर्धांगवायू झालेल्या आईची जबाबदारी पूर्णता त्यांच्यावर होती. मग त्यांनी ठरवलं की आता यापुढे कुटुंबाची जबाबदारी आपणच घ्यायची मोलमजुरी करत असतानाच पंचायत समितीमध्ये CHV म्हणून 50 रुपये पगारावर 18 वर्षे काम करता करता त्यांनी ठरवलं की जे शिक्षण घेणे मला शक्य झाले नाही,त्या शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवायची. त्यांची भेट मा.चव्हाण व बारवकर साहेब विस्तार अधिकारी यांच्याशी झाली. त्यांनी कष्टाळू मॅडमना संधी देण्याचे ठरवलं.त्यांची निवड रोपळे खुर्द येथील बालवाडीमध्ये केली.त्यांना उपळाईहून दररोज ५ किमी चालत जाताना गावकरी पाहत होते. कष्ट देखील बघत होते म्हणून गावकऱ्यांनी ठरवलं की त्यांना आपल्याच गावामध्ये घ्यायचं. त्यासाठी तेव्हाचे राजकीय नेते मा.बोधले महाराज,भालू(काका)मोरे तसेच हेडगिरे गुरुजी,मदन(नाना)नकाते,लक्ष्मण(तात्या)जाधव,अरुण (काका)शेंडे आणि इतर गावकऱ्यांनी त्यांना खूप मदत केली. ज्या आर्थिक परिस्थितीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही.तशी परिस्थिती इतर कुणावर ओढावू नये,यासाठी त्यांनी आपले जीवन गावातील गोरगरीबांसाठी खर्च करण्याचे ठरवले.अविरत आपली प्रामाणिकपणे शिक्षणसेवा त्यांनी गावकऱ्यांना दिली.या सेवेमुळे सर्व अधिकारी वर्गाचा, सर्वसामान्य गावकऱ्यांच्या मुलांचा ज्ञानाचा पाया भरण्याचे काम खूप चांगल्या पद्धतीने झाले.गावातील लहान मुले ही माझीच आहेत असे समजून ज्ञानदानाचे पवित्र काम केले.
नंतरच्या काळात सुरु झालेल्या अंगणवाड्या आणि बालवाडीतील शिक्षिका व सेविकाही तितक्याच निष्ठेने काम करताहेत.
याबरोबर शिक्षणाचा वटवृक्ष वाढविण्यास गावातील प्राध्यापक विजयकुमार शेटे यांनीदेखील खेड्यामध्ये कठीण काळात स्वतःची संस्था सुरू करून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आश्रमशाळा, माध्यमिक विद्यालय,ज्यू.कॉलेज सुरू केले. यात काळे,मोरे,राऊत सर,सतीश बाबर,चंदनशीवे,पोतदार,संतोष लोंढे, दिलीप शेटे,मिसाळ मॅडम व भुजबळ मॅडम,प्रफुल्ल शेटे यांसारख्या अनेक गुरुवार्यांनी उत्कृष्ठ काम केले.
आदर्श ISO मानांकित शाळा |
अंगणवाडीच्या पुढचा टप्पा म्हणजे प्राथमिक शिक्षण.याचा सुद्धा गावातील शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सिंहाचा वाटा आहे.1950 साली स्थापन झालेली,सातवी पर्यंत शिक्षण देणारी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा.मुलींची शाळा तलाठी कार्यालय जवळ तर मुलांची शाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर भरत असे. कालांतराने सहशिक्षण पद्धतीनुसार या दोन्ही शाळा एकत्र करण्यात आल्या. मुलींना शिक्षण देण्यासाठी उगलेबाई,नेमाडे बाई,गाडेकर बाई,जमालबाई आतार यांची नावे आज देखील घेतली. जातात. तर मुलांच्या शाळेमध्ये मुलांना चारित्र्यसंपन्न बनवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत सुरवातीला भगवान अवघडे गुरुजी आणि सुखदेव केशव आखाडे यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले होते. नेेेमाडे गुरुजी, अवघडेगुरुजी, वाघावकर गुरुजी, नागनाथ शिंदे(धाकटीउपळाई), हिरालाल आतार, घुंगुर्डे गुरुजी, सुभाष सातपुते, माणिक चव्हाण गुरुजी,गुंड,हेडगिरे गुरुजी,पाटील गुरुजी यांसारख्या गुरुजींची नावे आजही घेतली जातात. मध्यंतरीच्या काळामध्ये गावामध्ये शिक्षणासाठी दर्जेदार काम करण्याचे काम कै.भैरु जाधव, बापू चवरे, डोंगरे गुरुजी,सुरेश माळी,सलीम आतार,धनंजय नागटिळक,कुलकर्णी गुरुजी, तांबिले बंधू,शिंदे गुरुजी,गाडेकर,कवले, सावंत गुरुजी,काशीद दाम्पत्य,कुंभार सर, नकाते मॅडम,घुंगुर्डे मॅडम,शिंदे मॅडम यांसारख्या बऱ्याचशा शिक्षकांच्या गुरुमित्र मंडळ या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या उपक्रमातून ही गुरु मंडळी गावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सुरुवातीपासून झटत होती. त्यांनी नोकरी लागल्यापासून गावामध्ये तरुणांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करण्याचे मोलाचे कार्य केलं.त्यासाठी त्यानीं वेळोवेळी राज्यस्तरीय वक्तृत्व ,रांगोळी,प्रश्नमंजुषा यांसारख्या स्पर्धांमधून व्यासपीठ निर्माण करण्याचे कार्य केले. याच उपळाईतील शाळेमध्ये इयत्ता चौथी आणि सातवी केंद्रस्तरीय परीक्षा होत असे.
ISO मानांकन प्राप्त शाळा |
आज या शाळेचा नावलौकिक राज्यभर झालेला आहे. अ+ श्रेणीबरोबरच सर्वोच्च मानला जाणारा ISO मानांकन देखील पटकवलेल आहे.शैक्षणिक शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास तालुकास्तर प्रथम तर जिल्हास्तर तृतीय क्रमांक. 2013 साली घेण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रम तालुका पहिला क्रमांक सोलापूरमध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री दर्डा साहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला.
याकरता सुरेश माळी गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी,शिक्षणप्रेमी गावकरी यांनी खूप प्रयत्न केले.आजपर्यंत बऱ्याच मुलांनी गुणवत्ता शिष्यवृत्ती संपादन केली आहे.
श्री नंदिकेश्वर विद्यालय |
त्याचबरोबर या पुढचा टप्पा म्हणजे माध्यमिक शिक्षण सुरुवातीच्या काळात गावामध्ये देशमुख यांच्या वाड्यात,हनुमान मंदिरामध्ये, आखाडे यांच्या तीन खोल्यांमध्ये भरणाऱ्या शाळेला. गावातील प्रतिष्ठित बाळासाहेब देशमुख (इनामदार) यांनी तर रयत शिक्षण संस्थेच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळेस सध्या हेडगिरे यांच्या किराणा दुकानाच्या शेजारीची जागा खुली करून दिली.तिथे आठवी पासून पुढील वर्ग सुरू झाले.नंदीकेश्वर विद्यालयची स्थापना सन १९६७ साली झाली यावेळी पहिले शिक्षक मधुकर मिरजकर सर तसेच कबीर शेवडेसर माने सर, बी टी शिंदे भतगे सर.,एन एस साठे, जमादार इत्यादी शिक्षक होते यांनीच शाळेचा पाया घातला.गावकऱ्यांसह बहुजन समाजाने शाळेला बहु विविध मार्गांनी देणगी मिळवून माळरानावर दगड गोटे गोळा करून पाया भरणी केली.शिवाय महत्त्वाचे म्हणजे बांधकाम करणारे गवंडी सुखदेव शेंडगे, शेटफळकर यांनी श्रमदानातून त्यावेळी इमारत उभारली
मंदिर आणि वाड्यांमध्ये आणि इतर ठिकाणी भरणाऱ्या शाळा बघून,गावकऱ्यांच्या शिक्षणाची होणारे वाताहात बघून गावातीलच शिक्षणप्रेमी माळी बंधू यांनी गोदाबाई बाबाजी माळी यांचे स्मरणार्थ त्यांची बसस्थानकाजवळ रोडलगत असणारी दीड एकर जमीन रयत शिक्षण संस्थेकरता दान दिली.तर रामचंद्र फडतरे यांनी दोन एकर जमीन मुलांना खेळण्यासाठी मैदान म्हणून दिली.1967 साली स्थापन झालेली ग्रामदैवताच्या नावाने नामकरण केलेल नंदिकेश्वर विद्यालय खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांच्या बीज,रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं काम या शाळेने केलं.इथे असणारा सर्व शिक्षक वृंद खूप तळमळीने शिकवणारा होता नावाप्रमाणे रयतेची सेवा करणारा. प्रत्येक रयत सेवक गावातील मुलांना शिक्षण देत होता.यामध्ये शिकवणारे भाकरे सर,वणसाळे सर,पठाण सर,गिड्डे सर,पठाण मॅडम यांसारख्या शिक्षकांनी तर आपलं आयुष्य खर्ची केले.
मंदिर आणि वाड्यांमध्ये आणि इतर ठिकाणी भरणाऱ्या शाळा बघून,गावकऱ्यांच्या शिक्षणाची होणारे वाताहात बघून गावातीलच शिक्षणप्रेमी माळी बंधू यांनी गोदाबाई बाबाजी माळी यांचे स्मरणार्थ त्यांची बसस्थानकाजवळ रोडलगत असणारी दीड एकर जमीन रयत शिक्षण संस्थेकरता दान दिली.तर रामचंद्र फडतरे यांनी दोन एकर जमीन मुलांना खेळण्यासाठी मैदान म्हणून दिली.1967 साली स्थापन झालेली ग्रामदैवताच्या नावाने नामकरण केलेल नंदिकेश्वर विद्यालय खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांच्या बीज,रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं काम या शाळेने केलं.इथे असणारा सर्व शिक्षक वृंद खूप तळमळीने शिकवणारा होता नावाप्रमाणे रयतेची सेवा करणारा. प्रत्येक रयत सेवक गावातील मुलांना शिक्षण देत होता.यामध्ये शिकवणारे भाकरे सर,वणसाळे सर,पठाण सर,गिड्डे सर,पठाण मॅडम यांसारख्या शिक्षकांनी तर आपलं आयुष्य खर्ची केले.
इंग्रजीचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे अब्दुल रहीम पठाण व गणिताचे रामानुज म्हणून ओळखले जाणारे ज्योतीराम गिड्डे या राम-रहीम जोडीची ख्याती सर्व रयत शिक्षण संस्थेमध्ये होती.मुलांना एक वेगळेपणाने शिकवण्याची त्यांची कला आजपर्यंत कोणीही हस्तगत करू शकला नाही.
पठाण सर मुलांना खूप तळमळीने शिकवत.मागच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा संदर्भ देत प्रत्येक पाठ शिकवण्याअगोदर त्या पाठातील नवीन असणारे इंग्रजी शब्द फळ्यावर स्वतः लिहून देत. ते मुलांकडून पाठ करून घेत ट्रान्सलेशन पद्धतीने अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये इंग्रजी सारखा विषयी त्यांनी मुलांना अगदी आवडीचा बनवून टाकला.विषयांमध्ये 85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या प्रत्येक मुलाला 1000 रु बक्षीस देत. गिड्डे सरांनी गणितासारखा अवघड वाटणारा विषय मुलांना स्वतः फळ्यावर घेऊन अगदी बोटाला धरून फळ्यावर गिरवायला लावत. मोठी अवघड गणित देखील तुला जितका येतय तितक सोडव म्हणून मुलांना शिक्षक बनवून मुलांच्या मनस्थितीचा अभ्यास करून शिकवण्याची कला ही एक दैवी शक्ती होती.या विद्यालय मधील प्रशासकीय कामकाजामध्ये मुख्याध्यापक म्हणून साठे सर, धुमाळ सर,पवार सर ते लोकप्रिय शिपाई शिवशरण मामा,गायकवाड मामा यांच्या काळामध्ये शिक्षणाची ही ज्ञानगंगा खरोखरच खूप मोठी झाली. रोहिणी दिदीसारख्या विद्यार्थिनीने शाळा आणि गाव राज्यभर गाजवला.राज्यामध्ये पुणे बोर्डात क्रमांक पटवला.शाळेत सिद्धेवाडी,चिंचोली,बोकडदरावादी,उपळाई खुर्द ,मासोबाचीवाडी ,अंजनगाव, वडाचीवाडी ,बावी,रोपळे खुर्द यांसारख्या पंचक्रोशी मधून विद्यार्थी ज्ञानार्जन करण्यासाठी येतात.महाराणी लक्ष्मीबाई कन्या प्रशाला |
महाराणी लक्ष्मीबाई कन्या प्रशालेतील एक उपक्रम |
या नंतरच्या काळामध्ये देखील शांतीविनायक संस्थेच्या माध्यमातून सुधीर देशमुख यांनी देखील इंग्रजी माध्यमाची शाळा,माध्यमिक विद्यालय,ज्यू. कॉलेज सुरू करून गावातील मुलांना विज्ञान शाखेची व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
तरी देखील या सर्व शिक्षकांचं म्हणणं असच आहे की,"सोनार तेंव्हाच चांगला दागिना घडवू शकतो जेंव्हा सोने चांगल्या प्रतीचे असते." सोनं आणि सोनार दोन्ही चांगले आहेत म्हणूनच हि अधिकाऱ्यांची सुवर्ण पंढरी घडली. या सर्व शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण ,गावकऱ्यांची शिक्षणाची आस्था,मुलांची जिद्द या सर्वांमुळे गावातील मुलांना अधिकारी बनण्याची स्वप्न पडू लागली.ती पूर्ण करण्यासाठी धडपडू लागली आणि पूर्णत्वाला आले ते अधिकाऱ्यांचे गाव, अधिकाऱ्यांची पंढरी उपळाई बुद्रुक.
वाचनालय |
भाग -१ वाचण्यासाठी लिंकला टच करा
https://riyajatar12.blogspot.com/2020/04/blog-post.html
हा लेख आवडल्यासआपल्या गावाची माहिती जगाला देण्यासाठी share ,comment करा. commentbox च्या खाली उजव्या कोपर्यात असणाऱ्या Notify me समोरील बॉक्सला ✅टिकमार्क जरूर करा. 🙏
आपल्या शुभेच्छा व सुचना पुढे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील.
हा
लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार
करणे हा नसून केवळ गावाबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हा आहे. यातून
कुणाचा उल्लेख राहून गेला असल्यास अथवा कुणाचे मन दुखावले गेले असल्यास
मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…🙏
पुढील भागात गावाची यशस्वी वाटचाल व सांस्कृतिक परंपरा वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट
https://riyajatar12.blogspot.com
आपल्या सारखाच एक सामान्य गावकरी
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
पुढील भागात गावाची यशस्वी वाटचाल व सांस्कृतिक परंपरा वाचण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट
https://riyajatar12.blogspot.com