WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Thursday, July 10, 2025

शालेय परिपाठ दिनांक 11/07/2025

 *11/07/25 शुक्रवारचा परिपाठ*

❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂



 *💲शालेय परिपाठ💲*

❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉

    🇮🇳 *राष्ट्रगीत*  🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    ♦ *प्रतिज्ञा* ♦

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

    🇮🇳 *संविधान* 🇮🇳

❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ 

   🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀

*⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⋐⋑⛯⋐⋑*



▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*

 ━═●🇲◆🇸◆🇵●═━

 🍥 *11. जुलै:: शुक्रवार* 🍥

 ⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺

 आषाढ कृ.१, पक्ष :कृष्ण पक्ष,

तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~पूर्वाषाढा, 

योग ~वैधृति, करण ~बालव, 

सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0२ ]   ❂ सुविचार ❂* 

━┅═▣◆★✪★◆▣═┅━

11. *मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0३ ]   ❂ म्हणी व अर्थ ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


11. *कोल्हा काकडीला राजी –* 

  ★ अर्थ ::~ लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *गतस्य शोचनं नास्ति ।*

     ⭐अर्थ ::~ भूतकाळातील

   गोष्टींविषयी चिंता करू नये.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


     *🛡 ★ 11. जुलै ★ 🛡*

🔻====●●●★●●●====🔻

*★जागतिक लोकसंख्या दिन*

★हा या वर्षातील १९२ वा (लीप वर्षातील १९३ वा) दिवस आहे.


        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~

 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹

●१९९४ : दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर

●१९७९ : अमेरिकेची 'स्कायलॅब' ही अंतराळातील प्रयोगशाळा रात्री दहाच्या सुमारास हिंदी महासागरात कोसळली.

●१९०८ : लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.

●१६५९ : अफझलखानाशी मुकाबला करण्यासाठी शिवाजी राजे राजगडवरुन निघून प्रतापगड येथे पोचले.


    ~*★जन्मदिवस / जयंती★*~

 🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸

◆१९५३ : सुरेश प्रभू – केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री, उद्योगमंत्री, ऊर्जामंत्री आणि अवजड उद्योग मंत्री

◆१९२१ : शंकरराव खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू 

◆१८९१ : परशुराम कृष्णा गोडे – प्राच्यविद्या संशोधक. त्यांनी ४०० विषयांवर संशोधन करुन लिहीलेले निबंध ८ खंडात प्रसिद्ध झाले आहेत. 

◆१८८९ : नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. 


      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~

 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹

●२००९ : शांताराम नांदगावकर – गीतकार 

●२००३ : सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक 

●१९९४ : रामराव राघोबा राणे

 मेजर (निवृत्त)-- रणांगणावरील असामान्य कामगिरीबद्दलचा ’परमवीर चक्र’ हा सर्वोच्‍च सन्मान मिळवणारे, हा सन्मान मिळवणारे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या

 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..


     https://goo.gl/8D33ox

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪

*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*

   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*

       ●●●●●००००००●●●●●

या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे

हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे


नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी

मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी

स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे

दे वरचि असा दे


सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना

हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना

उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे

दे वरचि असा दे 


जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही

अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी

खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे

दे वरचि असा दे


सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी

ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी

तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे

दे वरचि असा दे

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]      ❂ प्रार्थना ❂* 

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *❂ भारत अमुचा देश ❂*

       ✶✶✹✹★●★✹✹✶✶

 भारत अमुचा देश, भारत अमुचा देव

'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक

भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक


आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी

प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी

दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ


धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू

उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू

विशाल भारत स्वप्‍नी त्याचा साकारू आलेख


प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला

मित्र जगाचे सार्‍या होऊ, मित्र करू या त्याला

सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0८ ]    ❂ बोधकथा ❂*

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


11. *❃❝ निर्मळता ❞❃*

     ━━═•●◆●★★●◆●•═━━

  एकदा गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येवून पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेवून येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरुसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरुकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरुनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरुनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरुसाठी घेवून आला. गुरुनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेवू नये."


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

    भावनेच्या भरात निर्णय न घेता शांत विचाराने निर्णय घ्यावे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *जेंव्हा वेळ आपल्या साठी*

*थांबत नाही मग आपण*

      *योग्य वेळेची वाट का* 

*पाहत बसायचे ?*

     *प्रत्येक क्षण हा योग्यच*

*असतो चुकतो तो फक्त* 

      *आपला निर्णय*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*

━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━


11. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*

   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑


✪ भारताने कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे ?

 ➜मीश्र अर्थव्यवस्था.


✪ गुगल हे काय आहे ?

 ➜सर्च इंजिन.


 ✪ कोंढाणा किल्ल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले ?

 ➜सिंहगड.


✪ रिजर्व बॅंकेचे राष्ट्रीयीकरण कधी झाले ?

 ➜१जानेवारी १९४९ 


 ✪ बिल गेट्स यांच्या कंपनीचे नाव काय आहे ?

 ➜ मायक्रोसाॅफ्ट 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*११ ] ❂ महत्वपूर्ण दिवस ❂* 

━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━


*11. ❒जागतिक लोकसंख्या दिन❒*  

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

   १९५० साली जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. अवघ्या ३७ वर्षात ११ जुलै १९८७ रोजी ती बरोबर दुप्पट म्हणजे ५ अब्ज झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८७ सालापासून, युनोच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) समितीने ठरविल्यानुसार ११ जुलै हा दिवस इशारा – दिन म्हणून पाळला जातो.


    झपाटय़ाने वाढणार्‍या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्रय़, बेकारी आणि रोगराई असे अनेक प्रश्न उद्भवू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे देशाच्या प्रगतीला लोकसंख्या ही बाब अडसर ठरत आहे. ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनस्तरावर ती सामूहिक प्रयत्नांची.. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या दिवशी हेच संकल्प करणे उचित ठरेल. त्याविषयी..

 

     जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. याविषयी जनजागृतीची गरज निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्र राज्याने ‘करूया कुटुंबाचे नियोजन आनंदी राहू प्रत्येकजण’ असे या दिनाचे घोषवाक्य ठेवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी सांगितले. लोकसंख्या ही समस्या उग्र रुप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत आहे. मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म दिला जातो. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबात लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येतात. हे सर्वे क्षणात दिसून आले आहे. यासाठी हे रोखणे गरजेचे आहे.

 

    आज वाढत्या लोकसंख्येमुळे एकीकडे गाडी, बंगला अशी एैशोआरामाची जीवनपध्दती तर दुसरीकडे दारिद्रय़, एक वेळची भूक भागविण्याची  धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

    1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटी होती. 11 जुलै 1987साली युगोस्लाव्हिया येथे मुलाचा जन्म होऊन जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. तेव्हापासून 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन/ इशारा दिन म्हणून पाळता जातो. जॉन ग्रँट यांना लोकसंखशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. तर जनगणनेचा जनक म्हणून सर डेजिल इबेटसन यांना ओळखले जाते.

★ लोकसंखवाढ चिंताजनक ★

    देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 140 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारताला मागे मागे टाकले आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••

       

█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌


 *❁शुक्रवार~11/07/2025❁*

*⋐⋑⛯⋐⋑⋐⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment

thank for ur valuable comment