मल्हार क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आज शाळेमध्ये शालेय बॅग,पाणी बाटली, वह्या,पेन यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्था अध्यक्ष मा. तानाजी व्हनमाने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिवव्याख्याते प्रतीक पाटील,अमन संधे,भारुडकर विजय टेंगले,पत्रकार अर्जुन हजारे,पत्रकार अभिजीत साळुंखे, शेतकरी न्यूज चॅनल संपादक अरुण पाटील, राहुल सरक,तेजस व्हनमाने, प्रसाद कोळी, सागर व्हनमाने उपस्थित होते. गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने शैक्षणिक साहित्य मिळावे याकरता श्री उत्तम महारनूर लोकप्रिय नेते यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच कविताताई टेंगले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खडतरे, रासप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किसनराव टेंगले, रासप जत तालुकाध्यक्ष संभाजी टेंगले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास महारनुर, उपाध्यक्ष कुलदीप खडतरे, उपस्थित होते. गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार.
No comments:
Post a Comment
thank for ur valuable comment