WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Showing posts with label माझी शाळा. Show all posts
Showing posts with label माझी शाळा. Show all posts

Tuesday, June 2, 2020

आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच का पाठवायची?

आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच का पाठवायची?

जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे गोरगरिबांची शाळा,येथे अशिक्षित, शेतकरी आणि मजुरांचीच मुले प्रवेश घेतात अशा प्रकारची काही विधाने काही वर्षापूर्वी ऐकायला मिळायची पण याच शाळांनी कात टाकत आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने याच गोरगरीबांच्या मुलांना प्रशासकीय अधिकारी बनवून सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांनी सिद्ध केले आहे कि without donation quality education  कोणत्याही फी शिवाय मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी हि एकमेव शाळा आहे. म्हणूनच आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांना तोडीसतोड विद्यार्थी घडविण्याचे किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस विद्यार्थी घडवण्याचे कार्य या शाळांमधील शिक्षक करत आहेत.
WITHOUT DONATION QUALITY EDUCATION
  जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा म्हणजे सामान्यांची शाळा यामध्ये शिकवणारा शिक्षकवर्ग देखील सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला, हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेला, जिद्दीनंं उभारलेला, स्वप्नपूर्तीच्या ध्येयानं पछाडलेल्या, स्वप्नांना पूर्ण करून या पदापर्यंत पोहोचलेला.
आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन
या शाळांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेेखणीय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. त्यामुळे मुलांमध्ये आदर्श अनुकरणीय व्यक्तिमत्वांमुळे सुजाण नागरिक घडण्यास मदत होते.
त्याच बरोबर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते 
चित्रकला स्पर्धा / रंगभरण स्पर्धा 

निबंध लेखनस्पर्धा 

सुंदर हस्ताक्षर स्पर्धा 

यांसारख्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना स्पर्धात्मक युगाची ओळख होऊन यश अपयश यामुले ते कधी खचून जात नाहीत तर जास्तीत जास्त प्रयत्नवादी होतात.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
दैनंदिन आणि जुन्या पद्धती ऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर ,ज्ञानरचनावाद ,कृतीयुक्त अध्यापन अशा अध्यापन पद्धतींचा वापर केल्याने मुलांच्या गुणवत्तेत दर्जेदार वाढ होत आहे. 
मुलांंना व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते, त्यामुळे त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच श्रमाची सवय आणि कष्टाची किंमत समजते आणि कष्टकरी यांच्याविषयी आदरभाव निर्माण होतो.शिक्षक हे  सामान्य कुटुंबातील प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे, या भावनेने त्यांना शिकविण्तयातच धन्यता मानतो.या शाळेमध्ये आपल्या मातृभाषेतून शिक्षण दिले जाते.
महात्म्यांच्या जयंती व पुण्यतिथी
वेगवेगळे सण, समारंभ, नेते-महात्मे यांच्या जयंत्या यांसारखे आदर्श कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामुळे मुलांमध्ये मूल्य संवर्धन जोपासना होण्याचे काम आपोआप घडते. शिक्षण तज्ञांचे मत आहे की मूळ हे इतर कोणत्याही भाषेपेक्षा आपल्या मातृभाषेतून शिकण्यात खूप प्रगती करतात. ही शाळा आपल्या घरालगत असल्यामुळे शिक्षक आणि पालक ह्या दोघांच्या समन्वयाने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नक्कीच होते.
मुलांना व्यावसायिक शिक्षण
शिक्षक देखील आसपासच्या परिसरातील असतात. त्यामुळे त्या शिक्षकांना मुलांच्या कौटुंबिक-सामाजिक गोष्टींचा बद्दल माहिती असल्याने प्रत्येक मुलाशी त्याची असलेली सहृदयता नक्कीच गुणवत्तेसाठी पूरक ठरते. जिल्हा परिषदेच्या शाळेत कोणत्याही प्रकारचा फी आकारणी केली जात नाही. त्यामुळे आठवी पर्यंत शिक्षण हे संपूर्णपणे मोफत असते.
दर्जेदार शालेय पोषण आहार
 सर्व शासकीय मदती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे कुठल्याही अपहाराची शक्यता नसते. मुलांना मोफत पाठ्यपुस्तक,मोफत गणवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, उपस्थिती भत्ता,
मुलांची मोफत आरोग्य तपासणी
 दिव्यांग भत्ता, दुर्दम्य आजारांवर ती मोफत इलाज जसे की सर्वांनी कर्णदोष, वाचा दोष असल्यास मोफत इलाज केला जातो. हृदयरोग यासारख्या आजारांवर  मोफत शस्त्रक्रियेचा इलाज केला जातो.त्यामुळे मुलांच्या  आरोग्यदायी जीवनाची हमी देता येते जी इतर शाळांमध्ये नसते.
वेगवेगळे शालेय उपक्रम
मुलांचा सन्मान आणि गौरव
वेगवेगळ्या स्पर्धा क्रीडा, स्पर्धा गायन स्पर्धा,संस्कृतिक कार्यक्रम,वेशभूषा स्पर्धा,कथाकथन स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, इंग्रजी  स्टोरी टेलिंग,राईम्स, बौद्धिक स्पर्धा, सहशालेय उपक्रम यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. 

शिक्षकांचा व्यक्तीचा पालकांशी संपर्क असल्यामुळे मुलांनाही शिक्षणाची एक प्रकारची ओढ लागते.शिक्षक हे आपल्यातीलच एक असल्याची भावना मुलांना शिक्षण घेण्यासाठी अंतःप्रेरणा देते.
म्शिक्षकांची निवड हि स्पर्धापारीक्षेतून झालेली असल्याने निवडक हुशार लोकांचीच निवड होत असल्याने मुलानाही दर्जेदार शिक्षणाची हमी आहे. शाळांवर सरकारी यंत्रणांचे नियंत्रण आणि मार्गदर्शन असल्याने आणखीनच सूत्रबद्ध पद्धतीने शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी प्रत्येक घटक धडपडत असतो.
या सर्वांचा विचार करा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नजीकच्या आपल्या. हक्काच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आजचा आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करा. 


आपल्या शुभेच्छा व सुचना पुढे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील. 
 

हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नाही. कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…..🙏.


  आपल्या सारखाच एक सामान्य नागरिक 
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)

माझे सर्व ब्लॉग वाचण्यासाठी व आपणास उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझ्या  ब्लॉग ला आवश्य भेट.

हा लेख आवडल्यास इतरांना माहिती  देण्यासाठी share ,comment करा.
commentbox च्या खाली उजव्या कोपर्‍यात असणाऱ्या Notify me समोरील बॉक्सला ✅ टिकमार्क जरूर करा. 🙏

Wednesday, May 13, 2020

काराजनगी शाळेचा हायटेक निकाल जाहीर

  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी
जि. प. शाळा -काराजनगी ,केंद्र- निगडी (खुर्द ) , ता-जत  जिल्हा- सांगली शाळेतील उपक्रम 
रियाज आतार
 कोविड 19 अर्थात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 16 मार्च 2020 पासून खासगी शाळा सहित जि. प.च्या शाळा देखील बंद आहेत . शासनाने इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या सत्र 2 च्या परीक्षा रद्द केल्या आणि आकारिक मूल्यमापनावर आधारित 100 पैकी रूपांतरण करून वार्षिक निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले . सर्व शाळांनी निकाल तयार केला परंतु 3 मे 2020 पर्यंत दुसरे लॉक डाऊन असल्याने सोशल डिस्टनसिंग पाळता येत नसल्याने शाळांनी शाळेत निकाल जाहीर केले नाहीत .  तथापि शासनाने ऑनलाईन निकाल जाहीर करावेत असे सुचवले .जि प.शाळा काराजनगी (ता-जत, जि-सांगली ) येथील हरहुन्नरी ,अष्टपैलू, उत्साही, गुरुमित्र आणि तंत्रस्नेही शिक्षक मा.श्री. रियाज रजाक अत्तार सर यांनी सॉफ्टवेअर मध्ये निकाल तर बनवला,  त्याच सॉफ्टवेअर  च्या फाईल्स अपलोड करून  लिंक वर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तो निकाल सध्या सर्व पालक ऑनलाईन पाहू शकतात, प्रिंट काढू शकतात.सदर निकालाच्या हार्ड कॉपी शाळा सुरू होताच पालकांना उपलब्ध करून दिल्या जातील .असे शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.आण्णाराव पाटील सर यांनी सांगितले .
          
   या वर्षीचा पाल्यांचा निकाल ऑनलाईन पाहून पालक भलतेच खुश झलेले आहेत.ग्रामस्थ ,पालक, SMC अध्यक्ष सर्व सदस्य हे मोठ्या उत्साहाने मोबाईलवर आपल्या पाल्याचा रिझल्ट (निकाल ) पाहून आनंद व समाधान व्यक्त करत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक श्री आण्णाराव पाटील सर आणि SMC अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी आत्तार सरांचे विशेष कौतुक केले .अत्तार सरांचे पालकांमधून देखील अभिनंदन आणि कौतुक होत आहे ...........
आपल्या सेवेत सदैव तत्पर
 कोरोनासारख्या वैश्विक महामारीमुळे आपल्या मुलाचा वार्षिक निकाल आपल्याला पाहता आला नाही, तरी तो आपल्याला घरबसल्या पाहता यावा याकरता आपल्या शाळेने आपणासाठी ऑनलाईन रिझल्ट पाहण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

 त्याकरता खालील प्रमाणे कृती करा.👇

1.खाली दिलेल्या निळ्या लिंकला टच करा* 

https://sites.google.com/view/online-result/home

2. आपल्या शाळेचा यु डायस 27350205001 नोंद करा
3. आपल्या मुलाची इयत्ता व तुकडी अ भरा.
4. आपल्या मुलाचा शाळेतील हजेरी क्रमांक अचूक नोंदवा.(माहितीसाठी फोटो दिला आहे)
5. आपल्या मुलाचा शाळेमध्ये रजिस्टरला नोंद असलेली जन्मतारीख अचूक नोंदवा
6. शेवटी खाली *submit* *या बटनाला टच करा
7. सबमिट बटन आला टच करताच आपल्या मुलाचा निकाल पीडीएफ स्वरूपातही मिळू शकेल.
8. फक्त निकाल पाहायचा असल्यास  submit self  या बटनाला टच करा
 
 घर बसल्या आपल्या मुलाचा प्रथम सत्र आणि द्वितीय सत्रचा निकाल पहा.

*उदाहरणा दाखल पहा*.👇

पौर्णिमा बाबासो गायकवाड
Udise 27350205001
 इयत्ता आठवी तुकडी अ
हजेरी क्रमांक 21
जन्मतारीख 11/01/2007आपल्या मुलांचा हजेरी क्रमांक आणि  जन्मतारीख जाणून घ्यायची असेल तर  हे पहा


 

 आपल्याच सोयीसाठी आपलाच
            गुरुमित्र रियाज आतार

Tuesday, April 28, 2020

काराजनागी शाळेत online प्रवेश अगदी मोफत

   
आता आपल्या मुलाचा किंवा मुलीचा *प्रवेश घाबसल्याच निश्चित करा*.


आपल्या सोयीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगीने कोरोनासारख्या वैश्विक आपत्तीच्या पार्श्व भूमीमुळे शाळेत न येताही आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याकरिता आपल्या सोयीसाठी online प्रवेश घेण्याकरिता सोय सुरु केली आहे.
फक्त खाली दिलेल्या निळ्या लिंक ला टच करा आणि आपल्या मुलाची माहिती भरून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश आपल्या हक्काच्या आणि दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी शाळेत प्रवेश निश्चित करा.

नमस्कार 
मी रियाज आतार  ( सहाय्यक शिक्षक) 
 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी
ता.जत जिल्हा सांगली 416404

 इयत्ता पहिली प्रवेश सन 2020-2021

             प्रवेशनोंदणी फॉर्म

गुगल प्रवेश फॉर्म भरताना  घ्यावयाची काळजी 

1.माहिती भरताना जन्म दाखला, रेशनकार्ड आणि आधार कार्ड वरील नोंदी प्रमाणे करावी.
2.एकदा नोंद केल्यास माहिती बदलता येणार नाही.
3.नोंदीमध्ये बदल हवा असल्यास फॉर्म पुन्हा भरावा लागेल
4.शाळेकडून अधिकृत मेसेज आल्यानंतरच प्रवेश निश्चित समजावा.
5.असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे.
6.अन्य माहिती लागू असेल तर भरा अन्यथा रिकामी ठेवा.
                 आपलेच गुरुमित्र
                     मुख्याध्यापक व सर्व सहकारी शिक्षक
                    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी 
                     तालुका जत जिल्हा सांगली

निळी लिंक👇👇👇

https://docs.google.com/forms/d/1-AgBgEt0MZaGHa6xFYcS9hyl4WMmfz3DFGPo1P7iYT0/edit?usp=drivesdk

काही अडचण आल्यास निसंकोच संपर्क करा.