महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठीची तयारी परिषदेकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी दिली. एप्रिल-मे या महिन्यांमध्ये होणारी ही पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने परीक्षा परिषदेकडून या शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
जुलैमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन परिषदेकडून केले जात असून त्यासाठीची गोपनीय माहिती गोळा करण्याच्या सूचना राज्यातील सर्वच शिक्षण अधिकारी आणि संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी परिषदेच्या संकेतांक स भेट द्या
👌👍🙏
ReplyDelete👌👌👍👍
ReplyDelete