*10/07/25 गुरूवारचा परिपाठ*
❂••⊰❉⊱•⊰❉⊱•⊰❉⊱••❂
*💲शालेय परिपाठ💲*
❉⌘❉⌘✽⌘✪⌘✽⌘❉⌘❉
🇮🇳 *राष्ट्रगीत* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
♦ *प्रतिज्ञा* ♦
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
🇮🇳 *संविधान* 🇮🇳
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤
🌀 *महाराष्ट्र गीत* 🌀
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *10. जुलै:: गुरूवार* 🍥
⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺⫹⫺
आषाढ पोर्णिमा, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~पूर्णिमा, नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~इन्द्र, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:07, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
10. *चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
10. *नळी फुंकली सोनारे, इकडुन तिकडे गेले वारे*
★ अर्थ ::~ सांगितलेल्या गोष्टी किंवा सुचना या कानाने ऐकुन त्या कानाने सोडून देणे. अशा लोकांना वारंवार सुचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना हवं तेच करतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
10. *विद्याविहीनः पशुः ।*
⭐अर्थ ::~ विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
*🛡 ★ 10. जुलै ★ 🛡*
🔻====●●●★●●●====🔻
★मातृसुरक्षा दिन
★हा या वर्षातील १९१ वा (लीप वर्षातील १९२ वा) दिवस आहे.
★बहामाचा स्वातंत्र्यदिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९२ : संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 'इन्सॅट २ ए' या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण
●१९९२ : आर्वी येथील ’विक्रम इनसॅट भू-केंद्र’ राष्ट्राला अर्पण
●१९७८ : मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ स्थापन करण्यात आले.
●१९२५ : अवतार मेहेरबाबा यांनी आपल्या मौनव्रताची सुरूवात केली. हे व्रत त्यांनी सलग ४४ वर्षे त्यांच्या मृत्यूपर्यंत पाळले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५० : ’बेगम’ परवीन सुलताना – पतियाळा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
◆१९४९ : *सुनील मनोहर तथा ’सनी’ गावसकर* – क्रिकेटपटू व समालोचक
◆१९४० : लॉर्ड मेघनाद देसाई – अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या ’हाऊस ऑफ लॉर्डस’चे सभासद
◆१९१३ : पद्मा गोळे – कवयित्री
◆१९०३ : रा. भि. जोशी – साहित्यिक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : जयवंत कुलकर्णी – पार्श्वगायक
●१९९५ : डॉ. रामकृष्ण विष्णू तथा ’दादासाहेब’ केळकर – ’गरिबांचे डॉक्टर’ म्हणून प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत मंदिराचे अध्यक्ष
●१९८९ : प्रभाकर ऊर्ध्वरेषे – साम्यवादी विचारवंत व साहित्यिक
●१९७१ : भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
10. *✸ मेरे देश की धरती.. ✸*
●●●●●००००००●●●●●
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
बैलों के गले में जब घुँघरू जीवन का राग सुनाते हैं
ग़म कोस दूर हो जाता है खुशियों के कंवल मुसकाते हैं
सुन के रहट की आवाज़ें यों लगे कहीं शहनाई बजे
आते ही मस्त बहारों के दुल्हन की तरह हर खेत सजे
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
जब चलते हैं इस धरती पे हल ममता अँगड़ाइयाँ लेती है
क्यों ना पूजे इस माटी को जो जीवन का सुख देती है
इस धरती पे जिसने जनम लिया उसने ही पाया प्यार तेरा
यहाँ अपना पराया कोई नही हैं सब पे माँ उपकार तेरा
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
ये बाग़ हैं गौतम नानक का खिलते हैं अमन के फूल यहाँ
गांधी, सुभाष, टैगोर, तिलक ऐसे हैं चमन के फूल यहाँ
रंग हरा हरिसिंह नलवे से रंग लाल है लाल बहादुर से
रंग बना बसंती भगतसिंह रंग अमन का वीर जवाहर से
मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती
मेरे देश की धरती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
10. *❂ ज्यास देव सापडला ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
ज्यास देव सापडला माणसाच्या ठायी
त्यास मंदिराच्या भिंती दिशा सर्व दाही
करुणेची निरांजन आत सांडते प्रकाश
त्याचे तन-मन पूजा आणि गाभारा आकाश
धूप वसंताचा तेथे दरवळून येई
दु:ख पाहुनी दुसर्याचे ज्याचे भरतात डोळे
डोळ्यांतल्या त्या पाण्याला तीर्थ भेटायास आले
अशा माणसाचा स्पर्श, पांडुरंग होई
धर्म पावसाचा अंगी ज्यास नसे नाव
अंकुरते जेथे जेथे तेच त्याचे गाव
असे गाव ज्याचा कोठे नकाशाच नाही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
10. *❝ दैवी संपत्ती ❞*
━━═•●◆●★●◆●•═━━
एक म्हातारं जोडप होतं.घराजवळच्या जागेत भाज्या लावाव्यात म्हणून तन-मन लावून झटत होते.एकदा खणता खणता त्या म्हाता-या माणसाच्या कुदळीला काही तरी लागलं.त्यानं खणून पाहिलं तर ती एक पेटी होती.उघडताच त्यातल्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.
ती म्हातारी स्री म्हणाली,चला,आपण आता श्रीमंत झालो.आपल्या संकटकाळी देवाने आपल्यासाठी मदत पाठवली आहे.
हे बघ,उगीचचं लाळ घोटू नकोस.ही जागा आपल्या मालकीची नाही.तेव्हा कशावरून देवाने ही संपत्ती आपल्यासाठीच पाठवली अाहे,असे समजायचे ?
म्हातारा म्हणाला.आपण ही अशीच इथे ठेवू देऊया.जर समज, ही संपत्ती आपल्यासाठीच देवाने पाठवली असेल,तर ती पाठवण्याची व्यवस्थाही तोच करेल.
पेटी होती त्याच जागी पुन्हा ठेवून ते दोघे तिथून निघून गेले.म्हातारीने ही गोष्ट सगळ्यांना सांगायला सुरुवात केली.पण कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते.त्या सगळ्यांना वाटलं की,म्हातारी काहीतरी थापा मारतेय.त्या गावात एक व्यापारी राहत होता.त्याला संपत्तीची खूप हाव होती त्याचाही तिच्या बोलण्यावर विश्वास नव्हता.पण एकदा खात्री करून घ्यावी या उद्देशाने तो एका रात्री त्या ठिकाणी पोहोचला.त्याने आपल्याबरोबर आपल्या दोन मुलांनाही घेतले.त्या तिघांनी ती पेटी खणून वर काढली.पेटीचे झाकण उघडताच नागाचा फुत्कार त्यांना ऐकू आला.तशी त्यांनी पेटी घाईघाईने बंद केली.आता मात्र व्यापा-याची खात्री पटली की,म्हातारीने आपल्याला फसवण्यासाठीच हा डाव टाकला आहे.तेव्हा तिला चांगली अद्दल घडवावी या उद्देशाने त्या तिघांनी ती पेटी दोरखंडाने बांधून ओढत ओढत म्हातारीच्या घराबाहेर आणली व ते निघून गेले.
सकाळी दरवाजा उघडताच ती पेटी दारात पाहून त्या दोघांनाही आनंद झाला.ती पेटी उघडताच पुन्हा त्या सोन्याच्या मोहरा चमकू लागल्या.त्या पेटीतून तो नाग केव्हाच पसार झाला होता.आता मात्र दोघांची खात्री पटली की,देवाने आपल्यासाठी पाठवलेली ही *दैवी संपत्तीच* आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
10. *आज सकाळी धुक्याने*
*एक छान गोष्ट शिकवली की*
*जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं*,
*एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
10. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ विमानाचा शोध कोणी लावला ?
➜राईट बंधू.
✪ गंगा नदीला बांग्लादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते ?
➜ पद्मा.
✪ 'हाॅपमॅन कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜टेनिस.
✪ शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ?
➜२४ कॅरेट.
✪ जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता ?
➜ नोबेल पुरस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
"गुरुपूर्णिमा"
भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला अत्यंत उच्च स्थान आहे. गुरू म्हणजे अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. गुरूशिवाय ज्ञानप्राप्ती अशक्य मानली गेली आहे. याच गुरूंच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या उपकारांची आठवण ठेवून दरवर्षी आषाढ पौर्णिमेला ‘गुरु पौर्णिमा’ साजरी केली जाते. हा दिवस गुरुंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. गुरुशिष्य परंपरेचे हे प्रतीक असलेले हे पर्व प्रत्येक विद्यार्थ्याला आणि आध्यात्मिक साधकाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
गुरु पौर्णिमा हा दिवस केवळ सण नसून, तो एक "आध्यात्मिक साधनेचा दिवस" आहे. अनेक साधक या दिवशी व्रत, उपवास, ध्यान आणि जप करून आपल्या गुरूच्या चरणी सेवा अर्पण करतात. याला आत्मशुद्धी, मनशांती व ईश्वरी कृपेचा दिवस मानले जाते.
गुरू हे आपल्या कर्म, मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध करण्यास मदत करतात. त्यामुळे गुरूशिवाय अध्यात्माची वाटचाल अपूर्ण मानली जाते.
गुरु पूर्णिमा ही हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांची एक अत्यंत महत्त्वाची सण/पर्व दिन आहे, जी गुरुंच्या सन्मानार्थ साजरी केली जाते. यामध्ये विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रमुख उद्दिष्ट असते.
🌟 गुरु पूर्णिमेचे महत्त्व:-
★धार्मिक महत्त्व:~
•हिंदू धर्मात:- या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांनी वेदांचे विभागीकरण आणि महाभारताचे लेखन केले. म्हणून या दिवसाला व्यास पूर्णिमा असेही म्हणतात.
•बौद्ध धर्मात:- भगवान गौतम बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना सारनाथ येथे या दिवशीच प्रथम धर्मोपदेश दिला होता. त्यामुळे बौद्ध धर्मातही हा दिवस विशेष मानला जातो.
•जैन धर्मात:- भगवान महावीरांचे प्रथम शिष्य इंद्रभूती गौतम यांनी या दिवशी दीक्षा घेतली, म्हणून हे ही दिवस महत्त्वाचा मानला जातो.
★ आध्यात्मिक महत्त्व:~
गुरू म्हणजे अज्ञान अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा. या दिवशी लोक आपल्या आध्यात्मिक गुरूंना वंदन करतात, आणि त्यांच्या मार्गदर्शनासाठी आभार मानतात.
★ शैक्षणिक महत्त्व:~
भारतीय शिक्षणपद्धतीत गुरू-शिष्य परंपरेला फार मोठे स्थान आहे. पारंपरिक शाळा (गुरुकुल) मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंचा सत्कार करून ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.
★गुरु पूर्णिमेचा संदेश:~
"गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥"
हा श्लोक गुरूचा महिमा सांगतो. गुरू म्हणजे ज्ञानाचा स्रोत, जो आपल्याला जीवनात योग्य दिशा दाखवतो.
हवं असल्यास मी गुरु पूर्णिमा साठी खास शुभेच्छा संदेश, कविता किंवा भाषणही तयार करून देऊ शकतो. सांगितलं तरी चालेल.
★गुरू म्हणजे कोण?
"गु" म्हणजे अंधार आणि "रू" म्हणजे प्रकाश. गुरू म्हणजे जो अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो. गुरू हा केवळ शिक्षक नसतो, तर तो एक मार्गदर्शक, संस्कारकर्ता, आणि जीवनाचे खरे दिशादर्शक असतो. गुरू आपल्या शिष्याला बाह्य जगाच्या ज्ञानासह अंतर्मनाचेही ज्ञान देतो. गुरूच शिष्याला आत्मोन्नती आणि मुक्तीकडे घेऊन जातो.
"गुरु ब्रह्मा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः॥
या श्लोकातून गुरूचे स्थान ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांइतकेच महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁गुरूवार ~10/07/2025❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ ⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment
thank for ur valuable comment