Quarantine राहून शाळेत फुलवली बाग
|
काम करत असताना टिपलेले छायचित्र |
जगभरामध्ये कोरोनासारख्या वैश्विक आजाराने थैमान घातले असून तसेच महाराष्ट्रातदेखील कोरोनाने थैमान घातले आहे. मुंबई, पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. मुंबई-पुण्यातून गावी आलेल्या लोकांविषयी गैरसमज आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने लोक त्यांना विलागीकरण कक्षात ठेवण्यासाठी आग्रही आहेत.त्याचे कारणही तसेच आहे।
मुंबई-पुण्यातून गावी गेलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या लोकांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. लोक क्वारंटाइन राहण्यास तयार नसतात. चोरून छपून येऊन घरात राहण्याचा प्रयत्न करतात पण, क्वारंटाउन सेंटरमध्ये राहुन एका तरुणीने शाळेचं रुप बदलून टाकलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील निढोरी गावची रहिवासी असलेली शामल दिग्विजय चौगले या नवविवाहितेला प्राथमिक शाळेत क्वारंटाइन करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळेकडे माणसं यायला घाबरत आहे. अशा वातावरणात शामल शाळेची बाग स्वच्छ करत होती. हे दृश्य समाजाच्या दृष्टीने समाधान देणारे आणि नवयुवकांना दिशादर्शक असंच आहे. शामल यांचे पती दिग्विजय चौगले हे भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत आहेत. आणि शामल पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. कोरोनाबाधित क्षेत्रातून आल्याने त्यांना प्राथमिक शाळेमध्ये विलगीकरणात राहावं लागत आहे.
याही परिस्थितीत त्या अभ्यासात मग्न आहेत. प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल तर कष्ट घ्यायची तयारी लागते धीर सोडून चालत नाही. मनानं खंबीर असावं लागतं. जे नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा खुबीने वापर करण्याची क्षमता अंगी बाळवावी लागते हेच शामल यांनी मनाशी पक्क केलं होतं.
या उलट प्राथमिक शाळेत विलगीकरणामध्ये राहायचं हा अनुभव खूपच त्रासदायक असाच असतो.म्हणून बरेच लोक तर गावाकडं जाण्याचा विचार सोडून आहे तिथेच थांबून आहेत.कारण इथं सुविधांंपेक्षा असुविधांचीच गर्दी जादा असते आणि मग तिथं वास्तव्याला आलेला प्रत्येक जीव क्वारंटाइन कालावधी संपण्यासाठी एक एक दिवस मोजत असतो आणि इथं एकट्याने राहायचं असेल तर मग विचारच न केलेला बरा. तरीही शामल यांनी या शाळेत एकटं राहण्याचा निर्णय घेतला आणि शाळेतील संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यांच्या कामामुळे गावातील लोकांनी कौतुक केलं आहे.
अशा व्यक्ती जर अधिकारी बनल्या तर आपल्या महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आणि प्रगती निश्चितच होईल.
अशा लोकांचा नेहमीच अभिमान वाटतो.अशाच आदर्शवादी व्यक्तिमत्वांना नेहमीच प्रसिद्ध आणि कौतुकाची थाप देणे हे आपल्यासारख्या नागरिकांचे कर्तव्य आहे.
अश्या व्यक्ती जर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनल्या तर त्या नक्कीच समाजाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत.या क्रांतिकारी कन्येला एक सुज्ञ नागरिक म्हणून खूप खूप धन्यवाद.असाच आदर्शवाडी सामाजिक कार्य उत्तोरोत्तर त्यांच्या हातून घडत राहो हीच शुभकामना..
हा लेख आवडल्यास इतरांना माहिती देण्यासाठी share ,comment करा.
commentbox च्या खाली उजव्या कोपर्यात असणाऱ्या Notify me समोरील बॉक्सला ✅टिकमार्क जरूर करा. 🙏
आपल्या शुभेच्छा व सुचना पुढे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील.
हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नाही. कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…🙏 आपल्या सारखाच एक सामान्य नागरिक
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
माझे सर्व ब्लॉग वाचण्यासाठी व आपणास उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट.https://riyajatar12.blogspot.com
Shiknyasaraki gost ahe
ReplyDeleteHo asach sarv shalet zal tar khup chan hoil
ReplyDeleteGrate work for education fildd
ReplyDelete