जगण्यासाठी आणखी काय हवं...?
मनात विचार आला, कशी जगतात ही माणसं, अशी आयुष्याला टकरा देणारी माणसे दिसली की खाड करून डोळे उघडतात, आपण जगत असलेल्या अवास्तव आयुष्यची लाज वाटायला लागते. या राजाराणीनं उघड्यावर मांडलेला संसार, त्यांना राजवाड्यापेक्षाही जास्त सुख देत असेल हे मात्र नक्की. आळस आणि निराशावाद सोडला आणि आयुष्यात हिम्मत, जिद्द आणि कष्ट करायची तयारी ठेवली की कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा आनंद घेता येतो.मग सर्व सोयींनीयुक्त आयुष्य जगूनपण गरजा पूर्ण न झालेल्या माझ्या सारख्याला प्रश्न पडतो की,
जगण्यासाठी आणखी काय हवं...?
सगळ्या भौतिक सुखसोयी असूनदेखील
सुखाच्या पाठीमागे धावणारे आम्ही आणखी सुखसोई शोधण्यात आयुष्य घालवतोय आणि आहे त्यात समाधान मानणारी ,आहे त्यातच आनंद निर्माण करून कमीत कमी गरजांमध्ये जगणारी माणस पहिली कि मनात प्रश्न येतो जगण्यासाठी आणखी काय हवं ?....
भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेले आपण आणि मिळेल ते खाऊन समाधान मानणारे ,वेगवेगळे व्यवसाय करून स्थलांतर करून अगदीमोडक्या-तोडक्या संसारामध्ये आनंद मिळवणारे ही मंडळी पाहिली की पुन्हा एकच प्रश्न मनात येतो जगण्यासाठी आणखी काय हवं?
आपण लहानपणापासून बघतोय अशी लोक गावात येतात.गावातील एखाद मोठं झाड,शाळेचा कोपरा,ग्रामपंचायत समोर, चौकात अशा ठिकाणी आपला फाटका संसार घेऊन,आपली पाल ठोकतात आणि सुरु होतो त्यांचा जगण्यासाठीचा आटापिटा. मिळेल ते आणि लोक देतील ते घेऊन ते आपलं काम आनंदानं करत असतात. गावातील लोकांचे काम पूर्ण झाली की पुन्हा पुढच्या गावाच्या मार्गाला ती लागतात. पुन्हा आपला फाटका संसार गाढवाच्या घोड्याच्या पाठीवर लादून पुढचे पायपीट सुरू होते डोक्यावर भले मोठे गाठोडे घेऊन काट्याकुट्यातून खड्यातून आपला जगण्यासाठी जाम मार्ग शोधत पुढे पुढे चालत जातात हे सगळं पाहिलं की मनात प्रश्न येतो जागायला आणखी काय हवं?
जगायला आणखी काय हवं?
हा लेख आवडल्यास इतरांना माहिती देण्यासाठी share ,comment करा.
commentbox च्या खाली उजव्या कोपर्यात असणाऱ्या Notify me समोरील बॉक्सला ✅टिकमार्क जरूर करा. 🙏
आपल्या शुभेच्छा व सुचना पुढे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील.
हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नाही. कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…🙏
माझे सर्व ब्लॉग वाचण्यासाठी व आपणास उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट.
https://riyajatar12.blogspot.com
आपल्या सारखाच एक सामान्य नागरिक
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
माझे सर्व ब्लॉग वाचण्यासाठी व आपणास उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट.
https://riyajatar12.blogspot.com
👍👍👍👍
ReplyDelete