WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Saturday, May 1, 2021

काराजनगी शाळेचा ऑनलाइन निकाल जाहीर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी यांच्या मार्फत....


💫 कोविड -१९ साथीच्या रोगाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता  विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल हा ऑनलाईन बघण्याची सुविधा दिनांक -: १ मे २०२१ वार -: शनिवार रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी खाली दिलेल्या विद्यार्थ्याच्या नावाला टच करून त्या संबंधित  निकाल विद्यार्थ्यांनी बघायचा आहे...

मुले 

नागेश मधुकर साळे 

सुशांत अनिल चौगुले 

दर्शन संतोष खिलारे 

 श्रवण विठ्ठल माने

     नवनाथ शामराव हक्के 

अमोल आनंदा माने

       सोहम गोरखनाथ माने 

 दऱ्याप्पा सुखदेव नरुटे

    संस्कार कृष्णा माने 

 संग्राम संतोष माने 

              अभिषेक रावसाहेब बिराजदार 

 विश्वजित विकास महाजन

  सुरज सुनील मोहिते  

  शुभम मधुकर भोसले

                                                अनिकेत भारत मोहिते                                    

        कृष्णराज संजय पवार

सुशांत सिद्धेश्वर चौगुले

मुली 

    दीक्षा अर्जुन संकपाळ  

 अंकिता अनिल माने

     निकिता भारत माने  

राजनंदिनी बिरुदेव बेडगे 

    श्रावणी पोपट झिंगे  

 शुभांगी शाम कदम

रचना रविंद्र मोहिते  

 शुभांगी संजय सावंत

कलावती महानिगाप्पा पुजारी



काही अडचण वाटल्यास अथवा शंका असल्यास संपर्क करा .


 वर्गशिक्षक   :    श्री. रियाज रजाक आतार 

                             ९९२२१४८७३२


(सूचना: हा अंतिम निकाल नसून यात तांत्रिक कारणाने त्रुटी असू शकतात. शाळा सुरु झाल्यावर आपणास प्रत्यक्ष गुणपत्रक देण्यात येतील.)

  सदर निकाल हा online अध्यापन ,स्वाध्याय , गृहभेटी  , यामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावर  दिलेला आहे 

                                       🙏🙏🙏🙏🙏

Tuesday, April 13, 2021

15 एप्रिल ते 30 एप्रिल काय आहेत निर्बंध जाणून घ्या 👇

 उद्या 8 पासून कडक निर्बंध ( पंढरपूर पोटनिवडणूक वगळून) 


पुढचे 15 दिवस 

काय आहे नियमावली जाणून घ्या


1. 144 लागू 

2. अनावश्यक येणे जाणे बंद

3. संचारबंदी असेल  

4. सकाळी 7 ते रात्री 8 5.अत्यावश्यक सुरू 

6.बस आणि लोकल फक्त अत्यावश्यक सेवासाठी सुरू

7. बँक सुरू राहतील 

8. पेट्रोल पंप सुरू राहतील

9. भाजीपाला , दूध सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहील

10. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त पार्सल सुरू 

11. रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना परवानगी ( फक्त पार्सल) 

12. गरिबांना 3 किलो गहू 

आणि 

2 किलो तांदूळ 

मोफत एक महिना 7 कोटी नागरिकांना मदत मिळेल

13. शिवभोजन थाळी मोफत 2 महिने 

14. उपाशी कोणी राहणार नाही

15. इंदिरा गांधी , संजय गांधी , निराधार , अंध अपंग या योजना मधील 35 लाख नागरिकांना अधिकचे 1000 रुपये आर्थिक सहाय्य देणार 

16. नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य ( 12 लाख कामगार) 

17. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य

18. अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये मदत ( 5 लाख)

19. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये ( 12 लाख लाभार्थी) 

20. 3000 हजार कोटी जिल्हाधिकारी यांना देणार त्या त्या जिल्ह्यासाठी आवश्यक त्या योजना त्यांनी कराव्यात .

Saturday, February 20, 2021

शेतजमिनीची मोजणी

 जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? जमीन मोजणीसाठी किती शुल्क आकारले जाते?


अनेकदा आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो.


त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.


आता आपण शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्रं लागतात, मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं आणि सरकारची ई-मोजणी प्रणाली काय आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.


मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे


शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.


या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.


आता हा अर्ज कसा भरायचा, ते पाहूया.


"मोजणीसासाठी अर्ज" असं या अर्जाचं शीर्षक आहे. यामध्ये सुरुवातीला तुम्ही ज्या तालुक्यातील कार्यालयात अर्ज सादर करत आहात, त्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे.


त्यानंतर पहिल्या पर्यायापुढे "अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता" याविषयी माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.


त्यानंतर "मोजणी करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील" हा दुसरा पर्याय आहे. यातील मोजणीच्या प्रकारासमोर "मोजणीचा कालावधी" आणि "उद्देश" लिहायचा आहे. त्यापुढे तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक टाकायचा आहे.

तिसरा पर्याय आहे "सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम." यासमोर मोजणी फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.


आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मोजणीसाठी जी फी (शुल्क) आकारली जाते, तिची रक्कम किती क्षेत्रावर मोजणी करायची आहे आणि ती किती कालावधीत करून घ्यायची आहे, यावरून ठरत असते.


जमीन मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. यात साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये, तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते.


एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास 1 हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी 2 हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी 3 हजार रुपये शुल्क आकारलं जातं.


त्यामुळे मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती "कालावधी" या कॉलममध्ये लिहू शकतात.


जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?


पीएम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची?


किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करायचा? या कार्डचे नेमके फायदे काय?


सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र सरकारने केले हे 11 बदल


"उद्देश" या पर्यायासमोर शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे. जसं की शेतजमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे, कुणी बांधावर अतिक्रमण केलं आहे का, हे पाहायचं आहे, असा आपला उद्देश शेतकरी लिहू शकतात.


त्यानंतर चौथ्या पर्यायात "सातबारा उताऱाप्रमाणे जमिनीचे सहधारक" म्हणजे ज्या गट क्रमांकाची मोजणी आणायची आहे, त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा अधिक जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावं, पत्ता आणि मोजणीसाठी त्या सगळ्यांची संमती आहे, अशा संमतीदर्शक सह्या आवश्यक असतात.


त्यानंतर पाचव्या पर्यायात "लगतचे कब्जेदार यांची नावे आणि पत्ता" लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहायचा आहे.


सगळ्यात शेवटी सहाव्या पर्यायासमोर "अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचं वर्णन" दिलेलं आहे.


शेतजमिनीची मोजणी आणण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात.


जर तुम्हाला शेतजमिनीव्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता म्हणजे घर, बंगला, उद्योगाची जमीन यांची मोजणी करायची असेल किंवा हद्दी निश्चित करायची असेल तर 3 महिन्यांची मिळकत पत्रिका आवश्यक असते.


ही सगळी माहिती भरून झाली की कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.


एकदा का अर्ज जमा केला की, तो ई-मोजणी या प्रणालीत फीड (दाखल) केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याच्या कागदपत्रांची तपासणी करून मोजणीसाठी किती फी लागणार आहे, याचं चलन जनरेट केलं जातं. त्या चलनाची रक्कम शेतकऱ्यानं बँकेत जाऊन भरायची असते.


त्यानंतर मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.


ई-मोजणी प्रणाली काय?


आता आपण जी प्रक्रिया पाहिली ती ऑफलाईन पद्धतीची आहे. यात शेतकऱ्याचा बराच वेळ जातो. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा भूमी अभिलेख विभाग ऑनलाईन पद्धतीनं जमीन मोजणी करण्याची प्रक्रिया राबवत आहे. यालाच ई-मोजणी असं म्हटलं जातं. सध्या यासंबंधीचं सॉफ्टवेअर विकसित करण्यावर काम सुरू आहे.


याविषयी सतीश भोसले (उपसंचालक, भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त (भूमापन), पुणे) यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "जमीन मोजणीचा अर्ज करण्यापासून ते मोजणीची नक्कल (प्रत) डाऊनलोड होईपर्यंत सगळी प्रक्रिया शेतकऱ्याला घरी बसून करता यावी, यासाठी भूमी अभिलेख विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी ई-मोजणी प्रणाली राबवण्यात येत आहे. या अंतर्गत शेतकरी स्वत: मोजणीचा अर्ज इंटरनेटवरून भरू शकतील. तसंच मोजणीची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आली, याचीही माहिती पाहू शकतील."



Saturday, November 28, 2020

केंद्रीय शिक्षण विभागाचे स्कूल बॅग धोरण जाहीर



बरेच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखीचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर केंद्र सरकार याविषयी संशोधन करत होते.
बरेच शिक्षणतज्ञ यांचे मतानुसार व वैद्यकीय तज्ञ यांच्या माध्यमातून संशोधन सुरू होते.



बरेच दिवसापासून पासून विद्यार्थ्यांच्या पाठदुखीच्या आणि दप्तराच्या ओझ्यासंबंधी  चर्चेअंती आज केंद्रीय शिक्षण विभागाने स्कूल बॅग धोरण जाहीर केले आहे.
 या स्कूल धरून च्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षण पासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे किमान व

जन  किती असावे? यासंबंधीच्या काही मार्गदर्शक सूचना या धोरणामध्ये जाहीर केल्या आहेत.
 त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

या धोरणातील महत्वाच्या बाबी 




👉 विद्यार्थ्यांच्या वजनाच्या 10 % एवढेच त्याच्या दप्तराचे ओझे असावे.

👉पूर्वप्राथमिक विद्यार्थ्याचे सरासरी वजन 10 ते 16  असते म्हणून त्यांना दप्तराचे ओझे नसावे.


👉 प्राथमिक म्हणजेच पहिली ते दुसरी विद्यार्थ्याचे सरासरी वजन   16 ते 22 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे १.६ किलो ते 2.2 किलो असावे.

👉 तिसरी ते पाचवी विद्यार्थ्याचे सरासरी वजन 15 ते 25 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 1.5 ते  2.5   असावे.


👉   विद्यार्थ्याचे म्हणजेच सहावी व सातवी  विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 20 ते 30  असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 2 ते 3 किलो असावे.


👉 माध्यमिक शाळा आठवीच्या विद्यार्थ्याचे सरासरी वजन 25 ते 40  असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे  2.5 ते 4 किलो  असावे.

👉 माध्यमिक शाळा नववी व दहावी विद्यार्थ्याचे सरासरी वजन 25 ते 45 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 2.5 ते 4.5 किलोअसावे.

👉 उच्च माध्यमिक शाळा अकरावी व बारावी विद्यार्थ्याचे सरासरी वजन 35 ते 40 असते म्हणून त्यांच्या दप्तराचे ओझे 3.5 ते 4 किलो असावे.

खालील लिंक ला टच करून

शैक्षणिक विडियोकरिता आमच्या. YouTube  चॅनल ला भेट द्या आणि subscribe करा
 आपला शिक्षक मित्र रियाज आतार


Saturday, October 31, 2020

नविन शैक्षणिक वर्षांकरिता वर्ग पहिली चे New Entry Tab सुरू झाले आहे

 

Student  Portal

नविन शैक्षणिक वर्षांकरिता वर्ग पहिली चे New Entry Tab सुरू झाले आहे

वर्ग पहिली विद्यार्थ्यांची  माहिती पोर्टलवर भरण्यासंदर्भात आपण माहिती पाहूया

दरवर्षी वर्ग पहिली विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला Student पोर्टलवर माहिती ऑनलाईन भरावी लागते


जसे विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल होतात सर्व विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर भरणे आवश्यक असते त्या

आपल्या शाळेची संचमान्यता करण्यासाठी कोणती अडचण येत नाही

म्हणून वेळोवेळी विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपडेट ठेवणे गरजेचे आहे

स्टुडंट पोर्टल वर माहिती भरण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा

Student Portal Website

त्यानंतर मुख्याध्यापक लॉगिन शाळेचा यु डायस नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा

आता आपल्याला इथून पुढच्या डॅशबोर्ड ओपन होईल


डॅशबोर्डवर Menu तील Excel वर क्लिक करून

Download Personal वर क्लिक करा व एक्सेल शीट डाउनलोड करा

Excel Sheet ला Rename करु नये , नाहीतर एक्सेल सीट अपलोड होणार नाही याची दक्षता घ्यावी , आपली मेहनत वाया जाईल.

आता एक्सेल शीट डाउनलोड झाल्यावर ओपन करा

आता  एक्सेल  शीट च्या वरच्या बाजूला पिवळ्या पट्टीला क्लिक करून

Enable Editing करा

आता पूर्णपणे एक्सेल  शीट ओपन होईल 

एक्सेल  शीट वर असलेल्या Insert वर क्लिक करा

आता विद्यार्थी ची माहिती भरण्यास सुरुवात करावी

विद्यार्थी माहिती

  • Name of student
  • Date of Birth
  • Gender
  • Mother's name
  • Standard
  • Division
  • General register number
  • Date of admission
  • Initial Admission standard
  • Religion
  • Category

प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती ती भरल्यानंतर Save करावे

विद्यार्थी माहिती भरताना काही बदल करायचे असेल तर Excel Sheet च्या Dashboard वरील Update वर क्लिक करून General Register No. टाकून Update करावे

जेव्हा Excel  Sheet वरील  सर्व विद्यार्थ्यांची माहिती पूर्ण होईल 

तेव्हा सदर Excel Sheet Save करावे

जेणेकरून काही Error आल्यावर आपल्याला दुरुस्त करता येईल

त्यानंतर Save As करताना एक फोल्डर तयार करावा

आता त्यात CVS (Comma delimited ) वर क्लिक करा सदर फाईल CVS फार्मेट यात Save As करावे हे ही प्रक्रिया झाल्यावर डिस्प्लेवर मेसेज येईल Yes करावे

आता आपली संपूर्ण प्रक्रिया झाली

अशाप्रकारे सर्व स्टेप पूर्ण करावे

जेणेकरून कोणतीच अडचण येणार नाही

Upload Personal Excel

मुख्याध्यापक लॉगिन शाळेचा यु डायस नंबर व पासवर्ड टाकून लॉगिन करा


Menu वर क्लिक करून Upload Personal वर क्लिक करा आता CVS फॉर्मेट यातील Excel Sheet Upload करा

  • Upload स्टेप 1 वर क्लिक करावे
  • Upload स्टेप 2 वर क्लिक करावे


त्यानंतर विद्यार्थी यादी  येईल . Status Accepted असा मेसेज डिस्प्ले वर दिसेल

जो Error येत असेल तो पूर्ण करावे

अशाप्रकारे वर्ग पहिली चे विद्यार्थी ची  माहिती ऑनलाईन भरावे

New Entry Other Class

वर्ग पहिली सोडून इतर वर्गासाठी 

New Entry Tab

वरून आपल्याला नवीन विद्यार्थीसाठी

नोंदणी करता येते

पण ज्या विद्यार्थ्यांची आतापर्यंत Student Portal वर  नोंदणी झाली नसेल तर 

New Entry Tab वरून  नोंदणी करता येते

New Entry Tab करिता आपल्या 

तालुक्यातील माननीय 

गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क 

साधावा

New Entry Tab उपलब्ध होईल 

 त्यानंतर Menu तील New Entry

 Tab वर क्लिक करून इतर वर्गातील

 नवीन विद्यार्थ्याचे माहिती भरावी


Thursday, October 22, 2020

नवोदय विद्यालय सहावी निवड परीक्षा 2021 साठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी वाचा पक्रिया सुरू




💥-सहावी

😀 प्रवेशपूर्व परीक्षा 2021

🔎अर्ज खालील लिंकवर क्लिक करून

 ऑनलाइन स्वरुपात भरा.


    CLICK HERE



1) JNVST/जवाहर नवोदय परीक्षा 2021 साठी ऑनलाइन अर्ज कसा भरावा ?याची प्रक्रिया समजून घ्या..

https://youtu.be/6nPtNiwSGh4

2) JNVST 2021 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याअगोदर प्रमाणपत्र वा offline अर्ज कसा भरावा याची परिपुर्ण माहिती साठी दिलेला व्हिडीयो पहा.

https://youtu.be/SrIAijaDWcg

Tuesday, October 6, 2020

पेन्शन हक्क संघटन माध्यमातून शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

 


मिरज तालुका जुनी पेन्शन हक्क संघटन कडून आरग,म्हैसाळ, भोसे व नांद्रे येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन मशीन पंचायत समिती मिरज कडे सुपूर्द.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मिरज कडून चार ऑक्सीजन  मशीन सभापती सौ. सुनीता पाटील ,उपसभापती दिलीप पाटील , मिरज तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.आप्पासो सलगर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्याहस्ते गट शिक्षणाधकारी श्री. प्रसाद कालगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गणेश भांबुरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय सावंत, आरग गटाचे नेते एस.आर.पाटील(बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

कोरोना महामारी कालावधीत शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन  माध्यमातून शिक्षकांनी सुरू ठेवत कर्तव्य पार पाडताना कोविड योद्धा म्हणून  चेक पोस्ट ड्युटी, कोविड सेंटर,सर्वेक्षण यासह सर्व  जबाबदारी पार पाडत आहेत.जिल्ह्यातील युवा शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील असताना.सामाजिक जाणिवेतून नेहमी कार्य करत आहेत.याच जाणिवेतून मिरज तालुक्यातील युवा शिक्षकांनी एकत्र येत  1 लाख 25 हजार निधी स्वयंप्रेरणेने जमा केला.त्यातून मिरज तालुक्यातील आरग,म्हैसाळ, भोसे व नांद्रे येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन मशीन देण्यात आले.शिक्षकांनी प्रत्येक आपत्ती मध्ये सामजिक जाणिवेतून आदर्श घालून दिला असून यावेळी ही पेन्शन हक्क संघटनने  आदर्श काम केल्याबद्दल सभापती सुनीता काकी पाटील,उपसभापती दिलीप पाटील , मिरज तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.आप्पासो सलगर, गट शिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांनी संघटनेचे कौतुक केले.

तालुकाध्यक्ष रमेश मगदूम व तालुका सरचिटणीस अनिल मोहिते यांनी या उपक्रमात तालुक्यातील शिक्षकांनी उत्सपूर्त सहभाग घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे , कार्यवाहक नेताजी भोसले ,राज्य प्रतिनिधी सागर खाडे , मिलन नागणे , अभिजित लंगडे , तालुकाध्यक्ष रमेश मगदूम , अनिल मोहिते , दिलीप नरुटे , राहुल गणेशवाडे ,पोपट निकम , विजय कदम , पठाण सर ,महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार   उपस्थित होते.

Monday, October 5, 2020

अशी शोधा गुगल वर माहिती जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

 


 अनेकदा आपल्याला गुगलवर काही माहिती शोधायची असल्यास नेमके काय आणि कसे सर्च करावे तेच आपल्या लक्षात येत नाही. मग त्यातल्या त्यात जवळ जाणा ऱ्या शब्दांवरुन आपण आपल्याला हवा असलेल्या गोष्टी शोधतो. मात्र त्यानंतर आपल्याला हवे ते मिळेलच असे नाही. गुगलवर कोणतीही गोष्ट करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपल्याला अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. बर्‍याचवेळा निरनिराळ्या प्रकारची माहिती गुगलवर आपण शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी महत्त्वाचा वेळ वाया जातो. अशावेळी कंटाळा येऊन काम लांबत जातं. आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल आपल्याला मदत करतं आणि परिणामी आपला वेळही वाचतो. गुगलवर माहिती शोधताना काही सोप्या पद्धती अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यामुळे बराच त्रास आणि वेळ वाचू शकतो.


१. आपल्या प्रश्नामध्ये ‘ +’ चिन्हाचा वापर करावा : समजा गुगलवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (उदा: विन्डोज ८ चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ‘ Windows8 + History ’ असे सर्च केल्यास गुगल हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.

२. आपल्या प्रश्नामध्ये ‘ – ’ चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास गुगलवर ‘sachin’ असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये ‘sachin tendulkar’ च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर ‘sachin -tendulkar’ असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणार्‍या उत्तरामध्ये ‘tendulkar” हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.

३. आपल्या प्रश्नामध्ये ‘ ~ ’ चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो. त्यामुळे हे चिन्ह जरुर वापरावे.


४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्‍याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो. उदा. ‘ www.facebook.com mobile’  असे दिल्यास गुगल फक्त www.facebook.com वर mobile हा शब्द शोधेल.


५. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास : आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगलवर त्या शब्दाच्या आधी ‘ define: ‘ असे दिल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ‘Define: Hard Disk’  असे शोधल्यास गुगल ‘ Hard Disk ‘ या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.

६. जसाच्या तसा शब्द शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच ” ” याचा वापर करावा. उदा. गुगलवर “contact us” असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.


७. आपल्या प्रश्नामध्ये ‘ * ’  चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ‘ * ’  चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर ‘friend* ’  असे शोधल्यास friend या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.


८. आपल्या प्रश्नामध्ये ‘?’  चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ‘ ?’  चिन्हाचा वापर करावा. उदा. ‘fri??d’ असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.



तुम्ही वापरा, इतरांसाठी शेअर करा