मिरज तालुका जुनी पेन्शन हक्क संघटन कडून आरग,म्हैसाळ, भोसे व नांद्रे येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन मशीन पंचायत समिती मिरज कडे सुपूर्द.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मिरज कडून चार ऑक्सीजन मशीन सभापती सौ. सुनीता पाटील ,उपसभापती दिलीप पाटील , मिरज तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.आप्पासो सलगर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्याहस्ते गट शिक्षणाधकारी श्री. प्रसाद कालगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गणेश भांबुरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय सावंत, आरग गटाचे नेते एस.आर.पाटील(बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
कोरोना महामारी कालावधीत शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन माध्यमातून शिक्षकांनी सुरू ठेवत कर्तव्य पार पाडताना कोविड योद्धा म्हणून चेक पोस्ट ड्युटी, कोविड सेंटर,सर्वेक्षण यासह सर्व जबाबदारी पार पाडत आहेत.जिल्ह्यातील युवा शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील असताना.सामाजिक जाणिवेतून नेहमी कार्य करत आहेत.याच जाणिवेतून मिरज तालुक्यातील युवा शिक्षकांनी एकत्र येत 1 लाख 25 हजार निधी स्वयंप्रेरणेने जमा केला.त्यातून मिरज तालुक्यातील आरग,म्हैसाळ, भोसे व नांद्रे येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन मशीन देण्यात आले.शिक्षकांनी प्रत्येक आपत्ती मध्ये सामजिक जाणिवेतून आदर्श घालून दिला असून यावेळी ही पेन्शन हक्क संघटनने आदर्श काम केल्याबद्दल सभापती सुनीता काकी पाटील,उपसभापती दिलीप पाटील , मिरज तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.आप्पासो सलगर, गट शिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांनी संघटनेचे कौतुक केले.
तालुकाध्यक्ष रमेश मगदूम व तालुका सरचिटणीस अनिल मोहिते यांनी या उपक्रमात तालुक्यातील शिक्षकांनी उत्सपूर्त सहभाग घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे , कार्यवाहक नेताजी भोसले ,राज्य प्रतिनिधी सागर खाडे , मिलन नागणे , अभिजित लंगडे , तालुकाध्यक्ष रमेश मगदूम , अनिल मोहिते , दिलीप नरुटे , राहुल गणेशवाडे ,पोपट निकम , विजय कदम , पठाण सर ,महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment
thank for ur valuable comment