आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच का पाठवायची?
जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे गोरगरिबांची शाळा,येथे अशिक्षित, शेतकरी आणि मजुरांचीच मुले प्रवेश घेतात अशा प्रकारची काही विधाने काही वर्षापूर्वी ऐकायला मिळायची पण याच शाळांनी कात टाकत आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने याच गोरगरीबांच्या मुलांना प्रशासकीय अधिकारी बनवून सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवल्याने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शाळांनी सिद्ध केले आहे कि without donation quality education कोणत्याही फी शिवाय मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी हि एकमेव शाळा आहे. म्हणूनच आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांना तोडीसतोड विद्यार्थी घडविण्याचे किंबहुना त्यांच्यापेक्षाही सरस विद्यार्थी घडवण्याचे कार्य या शाळांमधील शिक्षक करत आहेत.
WITHOUT DONATION QUALITY EDUCATION
जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा म्हणजे सामान्यांची शाळा यामध्ये शिकवणारा शिक्षकवर्ग देखील सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेला, हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलेला, जिद्दीनंं उभारलेला, स्वप्नपूर्तीच्या ध्येयानं पछाडलेल्या, स्वप्नांना पूर्ण करून या पदापर्यंत पोहोचलेला.
आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन |
या शाळांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेेखणीय कामगिरी केलेल्या आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. त्यामुळे मुलांमध्ये आदर्श अनुकरणीय व्यक्तिमत्वांमुळे सुजाण नागरिक घडण्यास मदत होते.
त्याच बरोबर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते
चित्रकला स्पर्धा / रंगभरण स्पर्धा |
निबंध लेखनस्पर्धा |
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा |
यांसारख्या स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना स्पर्धात्मक युगाची ओळख होऊन यश अपयश यामुले ते कधी खचून जात नाहीत तर जास्तीत जास्त प्रयत्नवादी होतात.
|
दैनंदिन आणि जुन्या पद्धती ऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापर ,ज्ञानरचनावाद ,कृतीयुक्त अध्यापन अशा अध्यापन पद्धतींचा वापर केल्याने मुलांच्या गुणवत्तेत दर्जेदार वाढ होत आहे.
मुलांंना व्यावसायिक शिक्षण दिले जाते.
वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते, त्यामुळे त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच श्रमाची सवय आणि कष्टाची किंमत समजते आणि कष्टकरी यांच्याविषयी आदरभाव निर्माण होतो.शिक्षक हे सामान्य कुटुंबातील प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे, या भावनेने त्यांना शिकविण्तयातच धन्यता मानतो.या शाळेमध्ये आपल्या मातृभाषेतून शिक्षण दिले जाते.
वेगवेगळे सण, समारंभ, नेते-महात्मे यांच्या जयंत्या यांसारखे आदर्श कार्यक्रम साजरे केले जातात. त्यामुळे मुलांमध्ये मूल्य संवर्धन जोपासना होण्याचे काम आपोआप घडते. शिक्षण तज्ञांचे मत आहे की मूळ हे इतर कोणत्याही भाषेपेक्षा आपल्या मातृभाषेतून शिकण्यात खूप प्रगती करतात. ही शाळा आपल्या घरालगत असल्यामुळे शिक्षक आणि पालक ह्या दोघांच्या समन्वयाने मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नक्कीच होते.
शिक्षक देखील आसपासच्या परिसरातील असतात. त्यामुळे त्या शिक्षकांना मुलांच्या कौटुंबिक-सामाजिक गोष्टींचा बद्दल माहिती असल्याने प्रत्येक मुलाशी त्याची असलेली सहृदयता नक्कीच गुणवत्तेसाठी पूरक ठरते. जिल्हा परिषदेच्या शाळेत कोणत्याही प्रकारचा फी आकारणी केली जात नाही. त्यामुळे आठवी पर्यंत शिक्षण हे संपूर्णपणे मोफत असते.
सर्व शासकीय मदती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे कुठल्याही अपहाराची शक्यता नसते. मुलांना मोफत पाठ्यपुस्तक,मोफत गणवेश, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना, उपस्थिती भत्ता,
दिव्यांग भत्ता, दुर्दम्य आजारांवर ती मोफत इलाज जसे की सर्वांनी कर्णदोष, वाचा दोष असल्यास मोफत इलाज केला जातो. हृदयरोग यासारख्या आजारांवर मोफत शस्त्रक्रियेचा इलाज केला जातो.त्यामुळे मुलांच्या आरोग्यदायी जीवनाची हमी देता येते जी इतर शाळांमध्ये नसते.
वेगवेगळ्या स्पर्धा क्रीडा, स्पर्धा गायन स्पर्धा,संस्कृतिक कार्यक्रम,वेशभूषा स्पर्धा,कथाकथन स्पर्धा,निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा, इंग्रजी स्टोरी टेलिंग,राईम्स, बौद्धिक स्पर्धा, सहशालेय उपक्रम यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.
शिक्षकांचा व्यक्तीचा पालकांशी संपर्क असल्यामुळे मुलांनाही शिक्षणाची एक प्रकारची ओढ लागते.शिक्षक हे आपल्यातीलच एक असल्याची भावना मुलांना शिक्षण घेण्यासाठी अंतःप्रेरणा देते.
म्शिक्षकांची निवड हि स्पर्धापारीक्षेतून झालेली असल्याने निवडक हुशार लोकांचीच निवड होत असल्याने मुलानाही दर्जेदार शिक्षणाची हमी आहे. शाळांवर सरकारी यंत्रणांचे नियंत्रण आणि मार्गदर्शन असल्याने आणखीनच सूत्रबद्ध पद्धतीने शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचावी यासाठी प्रत्येक घटक धडपडत असतो.
या सर्वांचा विचार करा आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नजीकच्या आपल्या. हक्काच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आजचा आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करा.
आपल्या शुभेच्छा व सुचना पुढे लिहिण्यासाठी नक्कीच प्रेरक ठरतील.
हा लेख लिहिण्याचा उद्देश ठराविक समाज अथवा समुदायाचा प्रचार किंवा प्रसार करणे हा नाही. कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो…..🙏.
आपल्या सारखाच एक सामान्य नागरिक
✍️- रियाज आतार (प्राथमिक शिक्षक)
माझे सर्व ब्लॉग वाचण्यासाठी व आपणास उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी माझ्या ब्लॉग ला आवश्य भेट.
हा लेख आवडल्यास इतरांना माहिती देण्यासाठी share ,comment करा.
commentbox च्या खाली उजव्या कोपर्यात असणाऱ्या Notify me समोरील बॉक्सला ✅ टिकमार्क जरूर करा. 🙏
सर पुनश्च एकदा खूप छान माहिती,👌👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद जामखेडकर
Deleteआपल्या प्रतिक्रिया पुढील लेखनास निश्चितच प्रेरणादायी ठरतील