हा लेख आवडल्यास like, share ,comment आणि fallow करा.
आणखी लेख वाचवायचे असल्यास खालील ब्लॉग ला नक्की भेट द्या.
https://riyajatar12.blogspot.com
कथा अदभूत वाहनाची
सोलापूर जिल्ह्यातील कथा लेखक हरीभाऊ हिरडे यांनी सायकल दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, समाजवादी पार्टीचे सायकल चिन्ह, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासह एलिझाबेथ एकादशी या चित्रपटातील सायकलचे पात्र यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे. याला सोशल मीडियातून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. हिरडे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटल की, खूप गाड्या आल्या गेल्या पण सायकलचे महत्त्व आजही टिकून आहे. सायकलचा सर्वत्र मुक्त संचार सुरु आहे. मुक्त या अर्थाने की तिला लायसन्स, किंवा आरटीओचा नंबर वगैरे काही नसतो. तिची कागदपत्रे बघण्यासाठी कोणी ट्रॉपिक पोलिस तुम्हाला अडवणार नाही. हॅल्मेट का वापरत नाही असेही कुणी विचारणार नाही. सायकल जास्त का पळवली वगैरे कोणी म्हणणार नाही. त्याची कारणे ही तशीच आहेत. सायकलवरून कोणी पडले, आपटले तरी ते जीवावर बेतले जात नाही. खरचटणार किंवा जास्तीत जास्त हात पाय मोडण्यावर जाते. ते ही आपण केलेल्या आगाऊपणामुळे. हॅंडलचा हात सोडून कित्येकजण सायकल चालवायला माहिर होते. पुढे त्यांनी असं म्हटलं की, मला हायस्कूलमध्ये जायला सायकल मिळाली. तशी अनेकांना शाळेसाठीच सायकल मिळते. म्हणजे मी हायस्कूलमध्ये सायकलवर जाण्यापूर्वी कशीबशी सायकल शिकलेलो. नळीवरून पाय पुरत नसणारी मुले हाफ पॅडल मारून सायकल चालवायचे. सीटवर बसायचे म्हणजे सायकल अंगावर पाडून घेणे. आज दिसतात तशा छोट्या छोट्या रंगीबेरंगी सायकलीपूर्वी खेड्यात नव्हत्या.
आमची आपली गावठी ब्लॅक अँड व्हाईट सायकल काळ्या रंगाची. पण ती आमच्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी मला वाटतं सायकल सर्वांच्याच जिव्हाळ्याचा, आवडीचे वाहन विषय! या सायकलला धु़णे, पुसणे कधीकधी तेलाने पुसणे. सायकल चमकावी म्हणून विवेक कुलकर्णी या मित्रांने पहिल्यांदा गावात रेंजर्स सायकल आणली. आमच्या आपल्या गावठी सायकली. ती रेंजर सायकलची चाके अगदी मोठमोठ मोटारसायकलसारखी. तिचा रंग, ब्रेक हॅंडलची बांधणी ही अगदी तशीच. आम्हाला त्याचे कौतुक वाटायचे. पण त्या सायकलवर डबलसीट बसायला कॅरेज अगदी छोटेसे. कुणी बसले तर मोडेल तुटेल अशी भिती असे. पुढे जाऊन समजले आपली काळ्या रंगाची गावठी सायकलच चांगली. कारण या सायकलवरून धान्य, बाजार, लाकडाची मोळी, गवताचा भारा आणता यायचे. प़ण रेंजर त्या कामाची नव्हती. रेंजरने काही खर्च काढला तर आमच्या सायकलच्या दुप्पट असायचा. ब्रेककांड्या, टायर, रिम असे तिचे पार्ट महाग असायचे. पंक्चर काढायला ही दुकानदार कंटाळा करायचे म्हणजे रेंजर फक्त धावायला डेंजर असावी, असे त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे, मोठ्या शहरांमध्ये गाड्यांच्या गर्दीत ही सायकल कुणाकडे दिसली की; आपल्याला आपले कुणीतरी भेटल्यासारखे वाटते. गतीच्या, स्पर्धेच्या या युगात सायकल कासवाच्या गतीने चालली आहे. पण शर्यत तिच जिंकेल असे वाटते आहे. सायकल चालवणे म्हणजे आपली प्रतिष्ठा खराब करून घेणे वगैरे वगैरे नवीन अंधश्रद्धा समाजात आहेत. पण आम्ही लोक आपल्या व्यायामासाठी, आरोग्यासाठी जिममध्ये खोटी सायकल चालवतो. या पोस्टमध्ये त्यांनी करमाळ्याच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. प्रदीप मोहिते, प्रा. भीष्माचार्य चांदणे, महात्मा गांधी विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आर. आर. मोरे यांचे संदर्भ दिले आहेत.हिरडे म्हणाले, पूर्वी अनेक आंदोलनात सायकलचा उपयोग झाला.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, स्व. गोपीनाथ मुंडे यांनी रॅलीत, निवडणूक प्रचारात सायकलचा वापर केला आहे. यांच्यासह इतर नेतेही सायकल वापरत होते. तेव्हा गाड्या नव्हत्या. जुन्या काळात प्रमुख नेते, पक्ष आदींना सायकाल सहाय्य ठरली. समाजवादी पक्षाने तर आपले चिन्ह सायकल निवडले.
मराठी चित्रपटात सायकल एक पात्र म्हणून आपली भूमिका बजवायला आजही येते.‘एलिझाबेथ एकादशी’ हा लहान मुलांवरील सिनेमा तर सायकलच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे मुलांचे आजही सायकल कौतुकाचा आवडीचा विषय. आता नवीन रंगीबेरंगी सायकल वाढत आहेत. जुन्या पध्दतीच्या सायकल खेडेगावात आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. अगदी खूप वय झाले तरी गावातील जेष्ठ व्यक्ती सायकल चालवतात, कदाचित त्यांच्या चांगल्या आरोग्याचे ते गुपित असावे .
आदर्श व्यक्तींचे मार्गदर्शन |
चित्रकला स्पर्धा / रंगभरण स्पर्धा |
निबंध लेखनस्पर्धा |
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा |
|
१ ते १० वी सर्व इयत्तांचे व विषयांचे प्रत्येक घटकांचे शैक्षणिक व्हिडीओ एकाच ठिकाणी पहा. ज्या ईयत्तेचे व्हिडीओ पाहायचे असतील त्या इयत्तेच्या...