WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Thursday, July 3, 2025

सामान्य ज्ञान प्रश्नावली क्रमांक 1

 

🔲🔲🌈🌱🌱🌈🔲🔲

*🔴सामान्यज्ञान प्रश्नावली🔴*


*(१) आंब्याच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- कोय

-----------------------------

*(२) फणसाच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- आठळी

-----------------------------

*(३) चिंचेच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- चिंचोका

-----------------------------

*(४) कापसाच्या बीला काय म्हणतात ?*

उत्तर -- सरकी 

-----------------------------

*(५) आपल्या देशाचे नाव काय आहे ?*

उत्तर -- भारत

-----------------------------

*(६) आपल्या राज्याचे नाव काय आहे ?*

उत्तर -- महाराष्ट्र

-----------------------------

*(७) सूर्य कोणत्या दिशेला उगवतो ?*

उत्तर -- पूर्व

-----------------------------

*(८) सूर्य कोणत्या दिशेला मावळतो ?*

उत्तर -- पश्चिम

-----------------------------

*(९) मोराचा तुरा कोठे असतो ?*

उत्तर -- डोक्यावर

-----------------------------

*(१०) कोणता पक्षी झाडाचे लाकूड कोरून घर बांधतो ?*

उत्तर -- सुतारपक्षी

-----------------------------

*(११) कोणत्या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणतात ?*

उत्तर -- सिंह 

-----------------------------

*(१२) कोणत्या प्राण्याला वाळवंटातील जहाज म्हणतात ?*

उत्तर -- उंट 

-----------------------------

*(१३) मोटारसायकला किती चाके असतात ?*

उत्तर -- दोन

-----------------------------

*(१४) इंद्रधनुष्यात किती रंग असतात ?*

उत्तर -- सात

------------------------------------

*(१५) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गरूड

-----------------------------------

*(१६) प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- सिंह

---------------------------

*(१६) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गुलाब

----------------------------

*(१७) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?*

उत्तर -- सोंड

--------------------------------

*(१८) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

-------------------------------

*(१९) कोळी या किड्याला किती पाय असतात ?*

उत्तर -- आठ 

-------------------------------

*(२०) घरात जळमटे करणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- कोळी

-------------------------------

*(२१) घराची राखण करणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- कुत्रा 

-------------------------------

*(२२) पंख असणारा पण पिल्लांना दूध पाजणारा प्राणी कोणता ?*

उत्तर -- वटवाघूळ

-------------------------------

*(२३) झुरळाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(२४) मुख्य ऋतू किती ?*

उत्तर -- तीन 

------------------------------

*(२५) सरडा या प्राण्याला किती पाय असतात ?*

उत्तर -- चार

-------------------------------

*(२६) बेडकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- चार

------------------------------

*(२७) मुंगी या किटकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(२८) वेगाने धावणारा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

---------------------------------

*(२९ ) घरमाशी या किटकाला किती पाय असतात ?*

उत्तर -- सहा

-------------------------------

*(३०) सापाला किती पाय असतात ?*

उत्तर -- पाय नसतात.

-------------------------------

*(३१) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?*

उत्तर -- शहामृग

-------------------------------

*(३२) माशाला किती पाय अस्तात ?*

उत्तर -- पाय नसतात.

--------------------------------

*(३३) आंबा या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

--------------------------------

*(३४) पेरू या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- अनेक बिया

--------------------------------

*(३५)  जांभूळ या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

-------------------------------

*(३६) सिताफळात किती बिया असतात ?*

उत्तर -- अनेक बिया

------------------------------

*(३७) आवळा या फळात किती बिया असतात ?*

उत्तर -- एक बी

---------------------------------

*(३८) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गरूड

-----------------------------------

*(३९) फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?*

उत्तर -- गुलाब

------------------------------

*(४०) एका दिवसाचे किती तास असतात ?*

उत्तर -- २४ तास

---------------------------------

*(४१) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?*

उत्तर -- वासरू

-------------------------------

*(४२) पिकलेल्या केळ्यांचा रंग कोणता ?*

उत्तर -- पिवळा


Tuesday, July 1, 2025

मल्हार क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आज जिल्हा परिषद कोसारी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

 


मल्हार क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आज शाळेमध्ये शालेय बॅग,पाणी बाटली, वह्या,पेन यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्था अध्यक्ष मा. तानाजी व्हनमाने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी शिवव्याख्याते प्रतीक पाटील,अमन संधे,भारुडकर विजय टेंगले,पत्रकार अर्जुन हजारे,पत्रकार अभिजीत साळुंखे, शेतकरी न्यूज चॅनल संपादक अरुण पाटील, राहुल सरक,तेजस व्हनमाने, प्रसाद कोळी, सागर व्हनमाने उपस्थित होते. गावातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने शैक्षणिक साहित्य मिळावे याकरता श्री उत्तम महारनूर लोकप्रिय नेते यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच कविताताई टेंगले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खडतरे, रासप पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष किसनराव टेंगले, रासप जत तालुकाध्यक्ष संभाजी टेंगले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास महारनुर, उपाध्यक्ष कुलदीप खडतरे, उपस्थित होते. गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप आभार.



Monday, June 30, 2025

सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २

 सामान्य ज्ञान प्रश्नावली क्र. २


 


प्रश्न १ - संत गोरोबा यांचा जन्म कुठे झाला ? 


उत्तर - तेरेढोकी ( त्रयदशा - धाराशिव )




प्रश्न २ - संत कान्होपात्रा यांचा जन्म कुठे झाला ? 


उत्तर - मंगळवेढा 




प्रश्न ३ - संत सेना महाराज यांचा जन्म कुठे झाला ? 


उत्तर - बांधवगड 




प्रश्न ४ - संत चोखामेळा यांचा जन्म कुठे झाला ? 

उत्तर - मेहुणराजा 




प्रश्न ५ - संत साईबाबा यांचा जन्म कुठे झाला ?


उत्तर - पाथरी

Saturday, April 5, 2025

रियाज आतार सर शिक्षण विभाग जत यांचे कडून सन्मानित

 रियाज आतार सर शिक्षण विभाग जत यांचे कडून सन्मानित 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने 2023 मध्ये घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक कोसारी शाळेतील आदर्श शिक्षक रियाज रजाक आतार यांनी तालुकास्तरावर तृतीय क्रमांक पटकाविल्याने जत चे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडोळकर ,गटविकास अधिकारी आनंदा लोकरे, शिक्षण विस्तार अधिकारी अनसर शेख व मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रमाणपञ, ट्राॅफी व दीड हजार रूपये बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी ही त्यांनी काम केलेल्या काराजनगी शाळेला सलग दोन वर्ष माझी मुख्यमंत्री सुंदर शाळेचा सन्मान मिळाला व पाच लाख रुपयांचे पारितोषक मिळाले या यशाबद्दल शाळेचे

 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास महारनुर, रासप पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किसन टेंगले, ग्रामस्थ व सर्व शिक्षक स्टाफ यांचेकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला

Tuesday, October 3, 2023

welcome

शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा २०२३-२४ 


शिक्षकाचे नाव : रियाज रजाक आतार 


शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी


केंद्र शेगाव 

तालुका जत जिल्हा सांगली

 

Sunday, October 24, 2021

महत्वाचे जीआर व परिपत्रक

 *महत्वाचे जीआर व परिपत्रक*


*निव्या लिंकला टच करून पहा*

शैक्षणिक अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब, बेल प्रेस करा


https://youtu.be/3t_MYUc1lY0

☝️

*निष्ठा प्रशिक्षण वेळापत्रक 2021=22 वर्षासाठी*


https://youtu.be/hhdP5UZtKLc

☝️

*अनुकंपा नियुक्तीचे धोरण महत्वाचा शासन निर्णय 27 सप्टेंबर 2021*


https://youtu.be/tIyx0pMgzck


*राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पाठाटाचण काढण्याची आवश्यकता नाही 5 सप्टेंबर 2019 चे पत्र*


https://youtu.be/EKGskOuIPUo

☝️

*राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून 25 टक्के रक्कम कशासाठी काढता येतील सूचना 8 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*


https://youtu.be/vgMSjD-cJ3w

☝️

*शालेय पोषण आहार नवीन वितरित बाबत 8 ऑक्टो 2021 संचालक पत्र*


https://youtu.be/mOBr5Iqs0h8

☝️

*पहिली ते दहावी वर्ग तासिका विभागणी व झालेला बदल 2021-22*


https://youtu.be/8ISa4Uve3v8

☝️

*राज्यातील शाळेतील मराठी व उर्दू माध्यम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिक्षक मार्गदर्शिका वितरीत करण्याबाबत 11-10-2021 चे पत्र*


https://youtu.be/6S4FweCb7lU

👆

*मोकळ्या जागेत पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याबाबत 11 ऑक्टोबर 2021चा शासन निर्णय*


https://youtu.be/KImqt7MLIJ8

☝️ पहा

*वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार आहार रक्कम 12 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*


https://youtu.be/b4MmFD1uznA

☝️

*अकरावी प्रवेश याबाबत 18 ऑक्टोबर 2021 चे पत्र*


https://youtu.be/tBwINE_Rj0g

☝️

मुक्त विद्यापीठ प्रवेशाबाबत


https://youtu.be/-KBlEdSLd24

☝️

*राज्यातील 25 ते 29 ऑक्टोबर 2021 शिक्षकांची कार्यशाळा सोबत वेळापत्रक आहे*


https://youtu.be/QyrURYNJoXY

☝️

*टीईटी परीक्षा वेळापत्रकात बदल*


https://youtu.be/krBMRItdYKw

☝️

*शैक्षणिक शुल्क 2021-22 वर्षात 15 टक्के कपात करणे बाबत*


https://youtu.be/hKBMBVimpuE

☝️

*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2021-22 आयोजनाबाबत 21-10-2021 संचालक पत्र*


https://youtu.be/0txHauJKtK8

☝️

*शिक्षक व मुख्याध्यापक यांचे वरिष्ठ व निवड श्रेणी चे ट्रेनिंग ऑनलाईन होणार 22 ऑक्टोबर 2021 चा शासन निर्णय*


https://youtu.be/mXwHKBytFBk

👍

*शिक्षणात व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना सवलत बाबत*


https://youtu.be/14DA_ctDWck

☝️

*संस्था कनिष्ठ महाविद्यालय तासिका तत्वावर सुधारित दर 22 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*


https://youtu.be/QuoSNKbRXtA

☝️

*पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार सूचना 20 ऑक्टोबर 2021 पत्र*


https://youtu.be/jlk40CuJCI8

👆

*मा. उच्च न्यायालयाचा निर्णय मुख्याध्यापकांना शालेय रेकॉर्ड दुरुस्त करण्याचा अधिकार प्रदान करण्याबाबत*


https://youtu.be/BoozRxXEPDE

👆

*शिक्षक पवित्र पोर्टल भरती 2021 निवड प्रक्रिया बाबत शिक्षण संचालक पुणे पत्र 7 सप्टेंबर 2021*


https://youtu.be/wIbIKyyZn60

👆

*संचमान्यता कार्यरत पदाची माहिती दिली नाही तर ऑक्टोबर महिन्याचा मुख्याध्यापकाचे वेतन अदा केले जाणार नाही*


https://youtu.be/moxvUuQv30o

👆

*सेवा पुस्तिकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याबाबत 23 जुलै 2013*


https://youtu.be/Q-H3HFQTnVA

👆

*टॅक्स आयकर नवी नियम 2021-22*


https://youtu.be/2U2B18vluxo

👍

शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन बाबत नागपूर उपसंचालक पत्र


https://youtu.be/obFjo3ORNx8

☝️

*जिल्हा वैद्यकीय शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र ची आवश्यकता नाही*


https://youtu.be/B7zLP1Jz7XI

☝️

*सत्र 2021-22- 10 वी साठी जलसुरक्षा विषय अनिवार्य*


https://youtu.be/vRqX_PBd-b8

*महाराष्ट्रातील सर्व मेडियम विद्यार्थ्यासाठी 21 सप्टेंबर 2021 पासून सह्याद्री वाहिनी टिलिमिली मालिका वेळापत्रक पहिली ते आठवी वर्ग*


https://youtu.be/G3BBL5-edJE

☝️

*शिक्षक पात्रता परीक्षा नवीन वेळापत्रक 2021-20 सप्टेंबर 2021 पत्र पुणे आयुक्त पत्र*


https://youtu.be/Yih4ktvCieI

☝️

 *शालेय स्पर्धा खेळ 2021-22 वयात बद्दल बाबत इंडियन फेडरेशन सचिव पत्र*


https://youtu.be/soOqhaJKP_w

☝️ 

*प्राथमिक माध्यमिक शाळेसाठी 20 टक्के अनुदान बाबत पत्र*


https://youtu.be/DacCTu0d_ZE

☝️

 *सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे कायम 21 सप्टेंबर 2021चे पत्र*


https://youtu.be/TQkFoPuMVwg

*महाराष्ट्रातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी निष्ठा प्रशिक्षण साठी नोंद करण्याबाबत पत्र*


https://youtu.be/G99i7G_mezY

☝️

*महाराष्ट्रातील शाळेत विद्यार्थ्याकरिता निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याबाबत 27 सप्टेंबर 2021 शासन निर्णय.*


https://youtu.be/YZ22IiAma6o

☝️

*शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतनचा पहिला व दुसरा हप्ताबाबत 27 सप्टेंबर 2021 पत्र*


https://youtu.be/J5mUPr6pJ3k

*महाराष्ट्रातील 4 ऑक्टो 21 पासून सुरक्षित शाळा सुरू करण्याबाबत सूचना 24 सप्टेंबर 21 जीआर*


*Subscribe*

*Like*

*Comments*

*Share*

Saturday, October 2, 2021

वर्णविचार



✔️* वर्ण :-


बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात. 

ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.


✔️बोल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत  त्यांना 'ध्वनी चिन्हे' किंवा 'अक्षरे' असे म्हणतात. 


✔️मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत.


👉*वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत. 


▪️१) स्वर

▪️२) स्वरादी 

▪️३) व्यंजने


👉  स्वर


🔸* स्वर :-


✔️१] ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना 'स्वर' असे म्हणतात.

✔️२] या वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात. 

✔️३] स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.

✔️४] स्वर म्हणजे नुसता सुर.


🔹* स्वरांचे प्रकार-


▪️अ] उच्चारावरून पडणारे दोन प्रकार


✔️१) ऱ्हस्व स्वर :- ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना 'ऱ्हस्व स्वर' म्हणतात.

उदा. - अ, इ, उ, ऋ, ऌ 

   

✔️२) दीर्घ स्वर :- ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.

उदा. - आ, ई, ऊ 


▪️ब] उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार


✔️१) सजातीय स्वर :- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण. 

उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ 


✔️२) विजातीय स्वर :-भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण. 

उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ


👉 स्वरादी


▪️* स्वरादी :-


✔️१] ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो, 

त्यांना स्वरादी म्हणतात. 

उदा :-अं, अ: 


✔️२] अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.


✔️३] यात अनुस्वार (._) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.


✔️४] अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या  वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.

शालार्थ पे बिल कसे पाहावे/ डाऊनलोड करावे.?

 


✳️ शालार्थ पे बिल कसे पाहावे/ डाऊनलोड करावे.?

✳️ शालार्थ वेतन प्रणाली

➡️ प्रथमतः Google crome वर जाऊन शालार्थ वेबसाईट टाकावी.


➡️ युजर नेमच्या ठिकाणी शालार्थ आय. डी. टाका.


      उदाहरणार्थ:- 02DEDGKCM8403


➡️ पासवर्ड ifms123 टाका


➡️ नंतर captch टाकून Submit म्हणा.


➡️ यानंतर password reset करून घ्या.


➡️ Old password ifms123 टाका.


🔰 New password


🔰 Confirm password टाका.




➡️ यानंतर logout करून पुन्हा new password ने log in करा.


➡️ यानंतर Worklist मध्ये "Employee Corner" मध्ये"Employee Payslip" ऑप्शन वर क्लिक करा.


➡️ त्यानंतर 


▶️ Select month


▶️ Select year


▶️ व "View salary slip" ऑप्शन ला क्लिक करून.👇


salary slip "print or save" करू शकता.


सदरील पे स्लिप तुम्ही PDF रूपात मोबाईलमध्ये पण सेव्ह करू शकता.

Saturday, July 24, 2021

११ मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्म कसा भरावा?

 

 Exam Quality Management - World Class Education

आपण २०२१ मध्ये दहावी पास झाला आहात तर आपल्याला ११ मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म कसा भरावा त्याचबरोबर फॉर्म लिंक कोणती आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे.

महाराष्ट्र CET अर्ज परीक्षा दिनांक

CET अर्ज सुरु दिनांक :- 20 जुलै २०२१ पासून सकाळी ११ नंतर

CET परीक्षा दिनांक :- २१ ऑगस्ट २०२१

दहावीचा निकाल नुकताच १६ जुलै रोजी लागला असून हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. हा निकाल लागल्यानंतर आपल्याला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी CET परीक्षा द्यावी लागते . हि परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे. तसेच आपल्याला हि परीक्षा द्यायची आहे कि नाही हे वेबसाईट वर माहिती द्यावी लागणार आहे. तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८ /- रुपये भरावे लागणार आहे.

परीक्षा शुल्क

महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे.

इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८/- रुपये भरावे लागणार आहे.

अर्ज कुठे भरावा

फॉर्म प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थी महाविद्यालयीन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करू शकतात. यानंतर, त्यांच्याकडे या साठी उपस्थित राहण्याचे किंवा न येण्याचे पर्याय त्यांच्याकडे असतील. त्यांना पाहिजे ते निवडू शकतात.


अर्ज येथे करा 👇

वेबसाईट

व्हिडीओ पाहण्यासाठी  👇