WECOOME

WELCOME TO MY BLOG AND THANKS FOR VISIT US. SEARCH BELOW YOUR NEED OR ANY HELP CALL ME 9922148732

dropdown

HEADER

HOME

शैक्षणिक बातम्या

शैक्षणिक बातम्या ∆∆∆सर्वत्र शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील ���� मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि शिक्षणसाठी शासन कटिबद्ध आहे-शिक्षणमंत्री ∆∆ $$$$..!!

WELCOME AGAIN

शिक्षकमित्र,विद्यार्थी,पालक तरुणांकरिता बनवलेल्या ब्लॉगवर मी रियाज आतार आपले सहर्ष स्वागत करत आहे..!

Visite our youtube chanel

Visite our youtube chanel

वरील लोगोवर टच करा आणि शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या.चॅनेलला subscribe बटणावर टच करून update माहिती मिळवा.

Tuesday, October 6, 2020

पेन्शन हक्क संघटन माध्यमातून शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

 


मिरज तालुका जुनी पेन्शन हक्क संघटन कडून आरग,म्हैसाळ, भोसे व नांद्रे येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन मशीन पंचायत समिती मिरज कडे सुपूर्द.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मिरज कडून चार ऑक्सीजन  मशीन सभापती सौ. सुनीता पाटील ,उपसभापती दिलीप पाटील , मिरज तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.आप्पासो सलगर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्याहस्ते गट शिक्षणाधकारी श्री. प्रसाद कालगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.गणेश भांबुरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय सावंत, आरग गटाचे नेते एस.आर.पाटील(बापू) यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.

कोरोना महामारी कालावधीत शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन  माध्यमातून शिक्षकांनी सुरू ठेवत कर्तव्य पार पाडताना कोविड योद्धा म्हणून  चेक पोस्ट ड्युटी, कोविड सेंटर,सर्वेक्षण यासह सर्व  जबाबदारी पार पाडत आहेत.जिल्ह्यातील युवा शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील असताना.सामाजिक जाणिवेतून नेहमी कार्य करत आहेत.याच जाणिवेतून मिरज तालुक्यातील युवा शिक्षकांनी एकत्र येत  1 लाख 25 हजार निधी स्वयंप्रेरणेने जमा केला.त्यातून मिरज तालुक्यातील आरग,म्हैसाळ, भोसे व नांद्रे येथील ग्रामीण रुग्णालयास ऑक्सिजन मशीन देण्यात आले.शिक्षकांनी प्रत्येक आपत्ती मध्ये सामजिक जाणिवेतून आदर्श घालून दिला असून यावेळी ही पेन्शन हक्क संघटनने  आदर्श काम केल्याबद्दल सभापती सुनीता काकी पाटील,उपसभापती दिलीप पाटील , मिरज तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.आप्पासो सलगर, गट शिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांनी संघटनेचे कौतुक केले.

तालुकाध्यक्ष रमेश मगदूम व तालुका सरचिटणीस अनिल मोहिते यांनी या उपक्रमात तालुक्यातील शिक्षकांनी उत्सपूर्त सहभाग घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे , कार्यवाहक नेताजी भोसले ,राज्य प्रतिनिधी सागर खाडे , मिलन नागणे , अभिजित लंगडे , तालुकाध्यक्ष रमेश मगदूम , अनिल मोहिते , दिलीप नरुटे , राहुल गणेशवाडे ,पोपट निकम , विजय कदम , पठाण सर ,महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार   उपस्थित होते.

Monday, October 5, 2020

अशी शोधा गुगल वर माहिती जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

 


 अनेकदा आपल्याला गुगलवर काही माहिती शोधायची असल्यास नेमके काय आणि कसे सर्च करावे तेच आपल्या लक्षात येत नाही. मग त्यातल्या त्यात जवळ जाणा ऱ्या शब्दांवरुन आपण आपल्याला हवा असलेल्या गोष्टी शोधतो. मात्र त्यानंतर आपल्याला हवे ते मिळेलच असे नाही. गुगलवर कोणतीही गोष्ट करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपल्याला अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. बर्‍याचवेळा निरनिराळ्या प्रकारची माहिती गुगलवर आपण शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी महत्त्वाचा वेळ वाया जातो. अशावेळी कंटाळा येऊन काम लांबत जातं. आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल आपल्याला मदत करतं आणि परिणामी आपला वेळही वाचतो. गुगलवर माहिती शोधताना काही सोप्या पद्धती अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यामुळे बराच त्रास आणि वेळ वाचू शकतो.


१. आपल्या प्रश्नामध्ये ‘ +’ चिन्हाचा वापर करावा : समजा गुगलवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (उदा: विन्डोज ८ चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ‘ Windows8 + History ’ असे सर्च केल्यास गुगल हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.

२. आपल्या प्रश्नामध्ये ‘ – ’ चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास गुगलवर ‘sachin’ असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये ‘sachin tendulkar’ च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर ‘sachin -tendulkar’ असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणार्‍या उत्तरामध्ये ‘tendulkar” हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.

३. आपल्या प्रश्नामध्ये ‘ ~ ’ चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो. त्यामुळे हे चिन्ह जरुर वापरावे.


४. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्‍याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो. उदा. ‘ www.facebook.com mobile’  असे दिल्यास गुगल फक्त www.facebook.com वर mobile हा शब्द शोधेल.


५. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास : आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगलवर त्या शब्दाच्या आधी ‘ define: ‘ असे दिल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ‘Define: Hard Disk’  असे शोधल्यास गुगल ‘ Hard Disk ‘ या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.

६. जसाच्या तसा शब्द शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच ” ” याचा वापर करावा. उदा. गुगलवर “contact us” असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.


७. आपल्या प्रश्नामध्ये ‘ * ’  चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ‘ * ’  चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर ‘friend* ’  असे शोधल्यास friend या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.


८. आपल्या प्रश्नामध्ये ‘?’  चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ‘ ?’  चिन्हाचा वापर करावा. उदा. ‘fri??d’ असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.



तुम्ही वापरा, इतरांसाठी शेअर करा

Thursday, October 1, 2020

सांगली जिल्हा परिषद 2019-2020 भविष्य निर्वाह खात्यामधील रक्कम पहा

भविष्य निर्वाह निधी लेखा सन 2019-2020
वित्त विभाग, सांगली जिल्हा परिषद सांगली यांचेकडून सन 2019-2020 भविष्य निर्वाह निधी चे हिशोब तक्ते वितरित करणेत आलेले आहेत. तसेच, सदर हिशोब तक्ते 
संकेतस्थळावर ऑनलाईन पाहणेची सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे.
व्यवस्थित दिसण्यासाठी आपला मोबाईल ब्राउजर मधून desktop mode मध्ये ठेवा
पाहण्यासाठी खालील फोटोला टच करा.



किंवा👇👇👇


सदर संकेतस्थळावरील महत्वाचा लिंक मध्ये भविष्य निर्वाह निधी लेखा सन 2019-2020 या मेनुवर क्लिक केल्यानंतर आपला भविष्य निर्वाह निधी क्रमांक प्रविष्ट करावा

तद्नंतर शोधा या बटनावर क्लिक करावे 

यावर आपला लेखा पाहण्यासाठी उपलब्ध होईल

सदर लेख्याची आपणास प्रिंट देखील घेता येईल

मागील वर्षांचे 2014 ते 2018 पर्यंतचे फंड तक्ते पहावयाचे असल्यास खालील बटणावर ती टच करा

Sunday, September 20, 2020

शिवपुर्वकालीन महाराष्ट्र

Quiz

इतिहास

चाचणी सोडवण्यासाठी वरील चौकोनावर क्लिक करा.

Time's Up!
Score:

Total Question:

Attempt:

Correct:

Wrong:

Percentage:

Friday, September 18, 2020

 

इतिहास

समाजसुधारक

चाचणी सोडवण्यासाठी वरील चौकोनावर क्लिक करा.

Monday, August 31, 2020

प्रवासासाठी असणारी ई - पास ची अट अखेर रद्द

     

  

खूप दिवसापासून कोरोनाच्या  वैश्विक आपत्तीमुळे सुरू असलेली ई- पास ची अट राज्यसरकारने रद्द केली असून आता सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणे सोईस्कर झाले आहेत.
मात्र अत्यावश्यक असेल तरच प्रवास करावा अन्यथा प्रवास करणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Unlock 4 ची प्रक्रिया सुरू असली तरी कोरोनाचा प्रभाव आणि प्रसार होतच आहे. तरी सर्वांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे.
      शासनाने बऱ्याचशा बाबतीत सवलत दिली असली तरी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
कोरोना घालवण्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.

        लोक आणि वस्तूंच्या प्रवासासाठी, राज्यात किंवा आंतरराज्यसाठी स्वतंत्र परवानगी किंवा ई-पास आवश्यक नसण्याची शक्यता आहे. 

काय बंद राहणार?
  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था आणि क्लासेस बंदच राहणार आहेत. ऑनलाईन, डिस्टन्स लर्निंग सुरु राहणार आहे.
  • सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम आदी स्थळे बंदच राहणार आहेत.
  • एमएचएने परवानगी दिल्याशिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदी.
  • मेट्रो सेवा बंदच राहणार आहे.
  • सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम बंद राहणार आहेत.
काय सुरु राहणार...
  • सामान्य दुकाने, दारुची दुकाने सुरु राहणार आहेत.
  • हॉटेल, लॉज 100 टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • सरकारी कार्यालये त्यांना दिलेल्या क्षमतेनुसार सुरु ठेवायची आहेत..
  • खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी आहे,
  • आंतरजिल्हा प्रवासासाठी आता परवानगी देण्यात आली असून कोणत्याही ई पासची गरज लागणार नाही.
  • खासगी बस, मिनी बस आदींच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
  • टॅक्सी - 1+3 प्रवासी, रिक्षा - 1+2 प्रवासी, चारचाकी- 1+3 प्रवासी, दुचाकी- 1+1 हेल्मेट आणि मास्क परवानगी

Thursday, August 27, 2020

तुकाराम मुंढे भारतीय प्रशासकीय सेवेतील सर्वोत्कृष्ट कर्तव्यदक्ष IAS

 

          तुकाराम मुंढे हे भारतीय प्रशासकीय सेवेत IAS कार्य करत असुन ते एक ईमानदार आणि प्रामाणिक, शिस्तप्रिय, व कर्तव्यनिष्ठ आधिकारी आहे. ते २००५ च्या बॅंचचे आधिकारी असुन त्यांची १४ वर्षाच्या सेवेत तब्बल १४ वेळा बदली झाली आहे. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील खेडेगावात झाला होता.मुंढे आणि त्यांच्या भावाने जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते. मुंढे हे अतिशय उज्वल विद्यार्थी होते. त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांचे इतिहास, सामाजिक शास्त्र मधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुसऱ्या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया संपेपर्यंत त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.

मे २००५ ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. ते देशात २० वे आले होते. तुकाcराम मुंढे यांच्या सेवेची सुरवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली. २००८ साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची सीईओ म्हणून निवड झाली. त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेट दिली. त्यात त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या सर्व शिक्षकांचे निलंबन केले. तेव्हापासून १०-१२ टक्के असणारे शिक्षकाचे गैरहजरीचे प्रमाण १-२ टक्क्यावर आले. वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केले. इतिहासात पहिल्यांदाच सीईओ डाॅक्टरला निलंबित केले होते.

२००९ सालीच नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला ‘अतिरिक्त आदिवासी आयुक्त’ पदावर करण्यात आली, हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केले होते. पुढे मे २०१० ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली. नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जिथे जेल तिथे आपल्या कामांनी वेगळीच छाप पाडत असत. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महिन्यांत पूर्ण केले.

पुढे २०११-१२ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले. सप्टेंबर २०१२ साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. त्यांच्या काळात १४३ कोटी रूपयांचा महसूल ५०० कोटीवर गेला. जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापूरातील २८२ गाव घेतले. या गावातील कामे त्यांनी फक्त १५० कोटी रूपयांमध्ये केले. यात लोकांचे योगदान ५०-६० कोटींचे होते. वर्षाला ४०० टँकर लागणार्‍या सोलापूरात टँकरची संख्या ३०-४० वर आली.

सोलापूर मध्ये असताना मुंढे याना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण १४-१५ लाख लोकं यावेळी वारीला हजेरी लावतात.त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौचविधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते.परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी असताना अवघ्या २१ दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी ३ हजार शौचालयाची व्यवस्था त्यांनी केली. त्याचवेळी मुख्यमंत्री सोडता इतर वी.आय.पी. दर्शन त्यांनी बंद केले.

नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘‘आयुक्तासोबत चाला’‘ (Walk With Commissioner) हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक कामचुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक, कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी नवी मुंबई मधील वाहतुकीची अडचण ओळखता, रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला ज्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा,पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला. पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली.

पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएमएल चे अध्यक्ष आहेत. दर महिन्याला पीएमपीएमएल ची ६ लाख लोकांची असणारी ग्राहकसंख्या ९ लाखांवर गेली. पुणे परिवहन बस ही देशातील पहिली रियल टाइम इ -टिकीटींग बस म्हणून दावा करण्यास सज्ज झाली आहे. एएफसीएस यंत्रणेमुळे मुख्याधिकारी केंव्हाही या तिकीटींग यंत्रणेवर नियंत्रण आणि निरिक्षण करू शकतात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये ४० टक्के वरून शंभर टक्के अशी वाढ गेल्या तीन महिन्यात झाली आहे.


नंतर २०१८ मध्ये नाशिकमधील कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंढे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. नाशिकच्या नागरिकांनी सातत्याने मुंढे  यांना पाठिंबा दिला. तेथूनही त्यांची बदली झाली.


सध्या नागपूर महापालिका आयुक्त पदी कार्यरत असतानाच सर्व पक्षीय कृती दलाच्या दबावामुळे पुन्हा त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदी झाली आहे.


🙏🏻

Wednesday, August 26, 2020

MPSC परीक्षा पुन्हा लांबणीवर राज्यसरकार निर्णयाच्या भूमिकेत

 JEE and cet exam पुढे ढकलण्याची मागणी समोर येत असतानाच राज्य शासनाने वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमी मुले एमपीएससी परीक्षाही पुढे ढकलण्याचा विचार करत आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या twiter अकाउंट वरून असे जाहीर केले आहे.

दरम्यानच्या काळात आयोगाने केंद्र बदलण्याची सोय केली होती.मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता दक्षता म्हणून राज्यशासन निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

 वाहतूक व डळवळणामध्ये विद्यार्थ्यांना कोरोणाचा धोका असल्याने हा निर्णय घेण्याचे विचाराधीन आहे.

कोरोनाच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर परिणाम झालेला असतानाच राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. MPSC अर्थात राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. 'कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल', असं ट्वीट करण्यात आलं आहे. एकीकडे केंद्र सरकार JEE आणि NEET परीक्षा घेण्यावर ठाम असताना राज्य सरकारने मात्र वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्यावर मोठी चर्चा सुरू झालेली आहे.


याआधी देखील राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. शेवटी २० सप्टेंबर रोजी ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यावर देखील आता राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

नियमित वेळापत्रकानुसार दरवर्षी या परीक्षा एप्रिल महिन्यात होता. मात्र या वर्षी कोरोनाचं संकट समोर असताना या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. एप्रिल महिन्यात ४ तारखेला ही परीक्षा (Competitive Exam) होणार होती. मात्र, कोरोनामुळे ती पुढे ढकलून २६ एप्रिल करण्यात आली. पण कोरोनाचं संकट वाढल्यामुळे २६ एप्रिलची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. अनिश्चित काळासाठी या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर १७ जून रोजी राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार १३ सप्टेंबर रोजी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण त्यानंतर पुन्हा एकदा त्या पुढे ढकलण्यात आल्या. २० सप्टेंबर ही तारीख जाहीर करण्यात आली होती. पण आता नव्यानं निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाचे काही विद्यार्थ्यांनी ट्विट करून विरोध केला असला तरी गोरगरीब विद्यार्थ्यांनी वाहतूक सोयीमुळे होणाऱ्या अडचणी विचार करून समाधान व्यक्त केले आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त केले जात आहे.