शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा २०२३-२४
शिक्षकाचे नाव : रियाज रजाक आतार
शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी
केंद्र शेगाव
तालुका जत जिल्हा सांगली
शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा २०२३-२४
शिक्षकाचे नाव : रियाज रजाक आतार
शाळेचे नाव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोसारी
केंद्र शेगाव
तालुका जत जिल्हा सांगली
*महत्वाचे जीआर व परिपत्रक*
*निव्या लिंकला टच करून पहा*
शैक्षणिक अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब, बेल प्रेस करा
☝️
*निष्ठा प्रशिक्षण वेळापत्रक 2021=22 वर्षासाठी*
☝️
*अनुकंपा नियुक्तीचे धोरण महत्वाचा शासन निर्णय 27 सप्टेंबर 2021*
*राज्यातील प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना पाठाटाचण काढण्याची आवश्यकता नाही 5 सप्टेंबर 2019 चे पत्र*
☝️
*राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतून 25 टक्के रक्कम कशासाठी काढता येतील सूचना 8 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*
☝️
*शालेय पोषण आहार नवीन वितरित बाबत 8 ऑक्टो 2021 संचालक पत्र*
☝️
*पहिली ते दहावी वर्ग तासिका विभागणी व झालेला बदल 2021-22*
☝️
*राज्यातील शाळेतील मराठी व उर्दू माध्यम विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शिक्षक मार्गदर्शिका वितरीत करण्याबाबत 11-10-2021 चे पत्र*
👆
*मोकळ्या जागेत पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू करण्याबाबत 11 ऑक्टोबर 2021चा शासन निर्णय*
☝️ पहा
*वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना मिळणार आहार रक्कम 12 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*
☝️
*अकरावी प्रवेश याबाबत 18 ऑक्टोबर 2021 चे पत्र*
☝️
मुक्त विद्यापीठ प्रवेशाबाबत
☝️
*राज्यातील 25 ते 29 ऑक्टोबर 2021 शिक्षकांची कार्यशाळा सोबत वेळापत्रक आहे*
☝️
*टीईटी परीक्षा वेळापत्रकात बदल*
☝️
*शैक्षणिक शुल्क 2021-22 वर्षात 15 टक्के कपात करणे बाबत*
☝️
*राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2021-22 आयोजनाबाबत 21-10-2021 संचालक पत्र*
☝️
*शिक्षक व मुख्याध्यापक यांचे वरिष्ठ व निवड श्रेणी चे ट्रेनिंग ऑनलाईन होणार 22 ऑक्टोबर 2021 चा शासन निर्णय*
👍
*शिक्षणात व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मुलांना सवलत बाबत*
☝️
*संस्था कनिष्ठ महाविद्यालय तासिका तत्वावर सुधारित दर 22 ऑक्टोबर 2021 शासन निर्णय*
☝️
*पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 मध्ये होणार सूचना 20 ऑक्टोबर 2021 पत्र*
👆
*मा. उच्च न्यायालयाचा निर्णय मुख्याध्यापकांना शालेय रेकॉर्ड दुरुस्त करण्याचा अधिकार प्रदान करण्याबाबत*
👆
*शिक्षक पवित्र पोर्टल भरती 2021 निवड प्रक्रिया बाबत शिक्षण संचालक पुणे पत्र 7 सप्टेंबर 2021*
👆
*संचमान्यता कार्यरत पदाची माहिती दिली नाही तर ऑक्टोबर महिन्याचा मुख्याध्यापकाचे वेतन अदा केले जाणार नाही*
👆
*सेवा पुस्तिकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याबाबत 23 जुलै 2013*
👆
*टॅक्स आयकर नवी नियम 2021-22*
👍
शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन बाबत नागपूर उपसंचालक पत्र
☝️
*जिल्हा वैद्यकीय शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र ची आवश्यकता नाही*
☝️
*सत्र 2021-22- 10 वी साठी जलसुरक्षा विषय अनिवार्य*
*महाराष्ट्रातील सर्व मेडियम विद्यार्थ्यासाठी 21 सप्टेंबर 2021 पासून सह्याद्री वाहिनी टिलिमिली मालिका वेळापत्रक पहिली ते आठवी वर्ग*
☝️
*शिक्षक पात्रता परीक्षा नवीन वेळापत्रक 2021-20 सप्टेंबर 2021 पत्र पुणे आयुक्त पत्र*
☝️
*शालेय स्पर्धा खेळ 2021-22 वयात बद्दल बाबत इंडियन फेडरेशन सचिव पत्र*
☝️
*प्राथमिक माध्यमिक शाळेसाठी 20 टक्के अनुदान बाबत पत्र*
☝️
*सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे कायम 21 सप्टेंबर 2021चे पत्र*
*महाराष्ट्रातील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी निष्ठा प्रशिक्षण साठी नोंद करण्याबाबत पत्र*
☝️
*महाराष्ट्रातील शाळेत विद्यार्थ्याकरिता निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याबाबत 27 सप्टेंबर 2021 शासन निर्णय.*
☝️
*शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतनचा पहिला व दुसरा हप्ताबाबत 27 सप्टेंबर 2021 पत्र*
*महाराष्ट्रातील 4 ऑक्टो 21 पासून सुरक्षित शाळा सुरू करण्याबाबत सूचना 24 सप्टेंबर 21 जीआर*
*Subscribe*
*Like*
*Comments*
*Share*
✔️* वर्ण :-
बोलताना निघणाऱ्या मूळध्वनीला वर्ण असे म्हणतात.
ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.
✔️बोल्यानंतर शब्द हवेत विरून जातात म्हणून लिखित स्वरूपत त्यांना 'ध्वनी चिन्हे' किंवा 'अक्षरे' असे म्हणतात.
✔️मराठी भाषेत एकूण ४८ मूळ वर्ण आहेत.
👉*वर्णांचे पुढील प्रमाणे तीन प्रकार आहेत.
▪️१) स्वर
▪️२) स्वरादी
▪️३) व्यंजने
👉 स्वर
🔸* स्वर :-
✔️१] ज्या वर्णांचा उच्चार दुसऱ्या वर्णांच्या मदती शिवाय म्हणजेच मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता केला जातो त्यांना 'स्वर' असे म्हणतात.
✔️२] या वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंतच्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात.
✔️३] स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे व पसरलेले असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो.
✔️४] स्वर म्हणजे नुसता सुर.
🔹* स्वरांचे प्रकार-
▪️अ] उच्चारावरून पडणारे दोन प्रकार
✔️१) ऱ्हस्व स्वर :- ज्यांचा उच्चार करायला कमी वेळ लागतो त्यांना 'ऱ्हस्व स्वर' म्हणतात.
उदा. - अ, इ, उ, ऋ, ऌ
✔️२) दीर्घ स्वर :- ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो त्यांना 'दीर्घ स्वर' म्हणतात.
उदा. - आ, ई, ऊ
▪️ब] उच्चारस्थानावरून पडणारे प्रकार
✔️१) सजातीय स्वर :- एकाच उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.
उदा. अ-आ, इ-ई, उ-ऊ
✔️२) विजातीय स्वर :-भिन्न उच्चारस्थानावरून उच्चारले जाणारे वर्ण.
उदा. अ-इ, आ-ए, इ-ऊ, अ-औ
👉 स्वरादी
▪️* स्वरादी :-
✔️१] ज्या वर्णाच्या उच्चाराआधी स्वराचा उच्चार करावा लागतो,
त्यांना स्वरादी म्हणतात.
उदा :-अं, अ:
✔️२] अं व अ: या दोन वर्णांना स्वरादी असे म्हणतात.
✔️३] यात अनुस्वार (._) व विसर्ग (:) असे दोन उच्चार आहेत.
✔️४] अनुस्वार व विसर्ग याचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना 'स्वरादी' असे म्हणतात.
✳️ शालार्थ पे बिल कसे पाहावे/ डाऊनलोड करावे.?
✳️ शालार्थ वेतन प्रणाली
➡️ प्रथमतः Google crome वर जाऊन शालार्थ वेबसाईट टाकावी.
➡️ युजर नेमच्या ठिकाणी शालार्थ आय. डी. टाका.
उदाहरणार्थ:- 02DEDGKCM8403
➡️ पासवर्ड ifms123 टाका
➡️ नंतर captch टाकून Submit म्हणा.
➡️ यानंतर password reset करून घ्या.
➡️ Old password ifms123 टाका.
🔰 New password
🔰 Confirm password टाका.
➡️ यानंतर logout करून पुन्हा new password ने log in करा.
➡️ यानंतर Worklist मध्ये "Employee Corner" मध्ये"Employee Payslip" ऑप्शन वर क्लिक करा.
➡️ त्यानंतर
▶️ Select month
▶️ Select year
▶️ व "View salary slip" ऑप्शन ला क्लिक करून.👇
salary slip "print or save" करू शकता.
सदरील पे स्लिप तुम्ही PDF रूपात मोबाईलमध्ये पण सेव्ह करू शकता.
आपण २०२१ मध्ये दहावी पास झाला आहात तर आपल्याला ११ मध्ये प्रवेश घेण्यासाठी CET फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म कसा भरावा त्याचबरोबर फॉर्म लिंक कोणती आहे याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे.
महाराष्ट्र CET अर्ज परीक्षा दिनांक
CET अर्ज सुरु दिनांक :- 20 जुलै २०२१ पासून सकाळी ११ नंतर
CET परीक्षा दिनांक :- २१ ऑगस्ट २०२१
दहावीचा निकाल नुकताच १६ जुलै रोजी लागला असून हा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे लावण्यात आला आहे. हा निकाल लागल्यानंतर आपल्याला दहावी नंतर पुढील शिक्षणासाठी CET परीक्षा द्यावी लागते . हि परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी आपल्याला महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे. तसेच आपल्याला हि परीक्षा द्यायची आहे कि नाही हे वेबसाईट वर माहिती द्यावी लागणार आहे. तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८ /- रुपये भरावे लागणार आहे.
परीक्षा शुल्क
महाराष्ट्र बोर्डाच्या विध्यार्थ्यांना परीक्षा फी मोफत असणार आहे.
इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी हि १७८/- रुपये भरावे लागणार आहे.
अर्ज कुठे भरावा
फॉर्म प्रसिद्ध झाल्यावर विद्यार्थी महाविद्यालयीन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करू शकतात. यानंतर, त्यांच्याकडे या साठी उपस्थित राहण्याचे किंवा न येण्याचे पर्याय त्यांच्याकडे असतील. त्यांना पाहिजे ते निवडू शकतात.
अर्ज येथे करा
वेबसाईट
व्हिडीओ पाहण्यासाठी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जुलै महिन्यात पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यासाठीची तयारी परिषदेकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांनी दिली. एप्रिल-मे या महिन्यांमध्ये होणारी ही पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने परीक्षा परिषदेकडून या शिष्यवृत्ती परीक्षेचे नियोजन करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
जुलैमध्ये ही परीक्षा घेण्याचे नियोजन परिषदेकडून केले जात असून त्यासाठीची गोपनीय माहिती गोळा करण्याच्या सूचना राज्यातील सर्वच शिक्षण अधिकारी आणि संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी परिषदेच्या संकेतांक स भेट द्या
या ब्रिज कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे विषयनिहाय गट तयार करण्यात आले आहेत. शैक्षणिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम ठरवणार असल्याचं SCERT ने स्पष्ट केलं.
हा ब्रिज कोर्स नेमका कसा असेल? ब्रिज कोर्स विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार आहे का? त्याचे स्वरुप काय असणार आहे? शाळा सुरू करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने तयारी सुरू केलीय का? अशा विविध प्रश्नांचा आढावा आपण या बातमीतून घेणार आहोत.
ब्रिज कोर्स कसा असेल?
15 जूनपासून राज्यात शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असते. प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या किंवा नाही झाल्या तरी या ब्रिज कोर्सपासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुरुवात व्हावी यादृष्टीने शिक्षण विभागाचे नियोजन आहे.
SCERT चे संचालक दिनकर टेमकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी समजा पाचवीत आहे. तेव्हा हा ब्रिज कोर्स चौथीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. शाळा बंद असल्याने तसंच ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा असल्याने विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत पण ज्याच्याशिवाय पुढील अभ्यासक्रम शिकता येणार नाही असे महत्त्वाचे विषय आम्ही ब्रिज कोर्समध्ये घेत आहोत."
• प्रत्येक विषयाचा ब्रिज कोर्स वेगळा असणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयासाठी ब्रिज कोर्स उपलब्ध असेल. गणित आणि विज्ञान या दोन विषयांवर अधिक भर दिला जाणार असल्याचं दिनकर टेमकर यांनी सांगितलं.
• हा ब्रिज कोर्स 45 दिवसांचा असणार आहे.
• यंदा विद्यार्थी इयत्ता तिसरीत असल्यास ब्रिज कोर्स हा दुसरीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे.
• पुढील वर्गात प्रवेश करत असताना विद्यार्थ्याला मागील वर्षाच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी किंवा त्या अधिक प्रभावीपणे शिकवण्यासाठी हा ब्रिज कोर्स मदत करेल.
• ब्रिज कोर्स शिकवल्यानंतरच विद्यार्थ्यांना चालू इयत्तेतील अभ्यासक्रम शिकवता येणार आहे.
• ब्रिज कोर्सकडे केवळ एक कोर्स पूर्ण करण्याच्यादृष्टीने पाहण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे ज्ञान, प्रात्यक्षिक, त्यांचे अनुभव याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा असल्याचे एससीईआरटी मराठी विभाग प्रमुख आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
• सुरुवातीला शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा स्तर काय आहे याची चाचपणी करण्याच्या सूचना आहेत. ब्रिज कोर्स शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना अपेक्षित क्षमता प्राप्त झाल्या आहेत की नाही हे सुद्धा शिक्षकांना पहावे लागणार आहे.
• हा ब्रिज कोर्स सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अशा सर्व शाळांसाठी असणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या प्रत्येक शैक्षणिक व्यवस्थापनाला ब्रिज कोर्स शिकवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात येणार आहेत.
• मराठी, गणित, सामाजिकशास्त्र अशा प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र ब्रिज कोर्स असणार आहे. SCERT यासंदर्भातील नियोजन करत असून प्रत्येक विषयाच्या अभ्यास मंडळांकडून ब्रिज कोर्स अंतिम केला जाणार असल्याचे समजते.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) मराठी भाषा विभागाच्या प्रमुख आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मुलांचा लर्निंग लॉस भरून काढण्यासाठी हा ब्रिज कोर्स तयार केला जात आहे. शाळा बंद असल्याने दुसरीत गेलेला विद्यार्थी प्रत्यक्षात पहिलीत शाळेत न जाता दुसरीत गेला आहे. तेव्हा प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे असं आम्ही गृहीत धरत आहोत आणि त्यादृष्टीने ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम निश्चित करत आहोत."
"पुढील इयत्तेत शिक्षण घेत असताना अनेक गोष्टी पूर्वज्ञानावर अवलंबून असतात. त्या मुलांना आल्या पाहिजेत हा आमचा हेतू आहे." असं संचालक दिनकर टेमकर यांनी सांगितलं.
ब्रिज कोर्सची आवश्यकता का आहे?
गेल्या वर्षीपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अपेक्षित शिक्षण पोहचलेलं नाही. अनेक विद्यर्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणाचीही सोय नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपेक्षित आकलन झालेले नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे.
विद्यार्थ्यांचे जवळपास दोन वर्षांचे शैक्षणिक नुकसान झाले असून शाळा सुरू झाल्यानंतर ही पोकळी भरून काढल्याशिवाय पुढील इयत्तेचा अभ्यास शाळांनी सुरू करू नये अशीही काही शिक्षकांची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर हा ब्रिज कोर्स तयार करण्यात येत असल्याचे समजते.
ब्रिज कोर्स संदर्भातील एका बैठकीत सहभागी झालेले शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "ऑनलाईन शिक्षणात अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचलेलं नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास, तिसरीत विद्यार्थ्यांची गुणाकाराची संकल्पना स्पष्ट झाली नाही तर चौथीत भागाकार करण्यात त्यांना अडचणी येणार. एकूणच विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहणार. हे केवळ एका विषयाच्या बाबतीत नाही तर प्रत्येक विषयाची ही परिस्थिती असू शकते."
"शाळा सुरू झाल्यानंतर थेट अभ्यासक्रम शिकवण्यापेक्षा शैक्षणिक नुकसान झालेली पोकळी भरून काढणं गरजेचं आहे. यासाठी ब्रिज कोर्स महत्त्वाचा आहे. केवळ पुस्तकी अभ्यासक्रम नव्हे तर विद्यार्थ्यांचे समुपदेशन त्यांचे मानसिक आरोग्य याचाही विचार व्हायला हवा." असंही त्यांनी सुचवलं.
'लर्निंग लॉस' म्हणजे नेमके काय?
राज्यातील अनेक शिक्षक ब्रिज कोर्ससाठी पूर्व तयारी करत असून यासंदर्भात शिक्षकांमध्येही मतेमतांतरे आहेत.
ब्रिज कोर्समध्ये केवळ पुस्तकी अभ्यासक्रमावर भर देण्यात येऊ नये तर विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, त्यांचे समुपदेशन अशा गोष्टींचीही दखल घेण्यात यावी असं मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केलं आहे.
लॉकडॉऊन काळात ग्रामीण, दुर्गम आणि अतीदुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा शैक्षणिक फटका बसल्याचे दिसून आले.
लॉकडॉऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंदर्भात सर्वेक्षण करणाऱ्या क्वेस्ट एज्यूकेशन संस्थेचे प्रमुख निलेश निमकर सांगतात, "दोन प्रकारचा लर्निंग लॉस असतो. पहिला म्हणजे यापूर्वी जे मुलांना येत होतं त्यातूनही मुलं थोडी मागे गेल्याचे दिसते. दुसरं म्हणजे यावर्षी जे शिकले असते तेवढे शिक्षणही त्यांच्यापर्यंत पोहचले नाही."
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात क्वेस्टा संस्थेने शंभरहून अधिक मुलांचे यासंदर्भात सर्वेक्षण केले. त्यानुसार, लॉकडॉऊनपूर्वी वाचून समजायचे अशी मुलंही आता यात मागे गेल्याचे दिसते.
ते सांगतात, "लॉकडॉऊन सुरू झालं तेव्हा मुलांना काहीतरी येत होतं. पण त्यातही मुलं मागे पडल्याचे दिसते. वर्षभर शिकली असती पण विद्यार्थ्यांना ती संधीही मिळाली नाही. ब्रिज कोर्सचा अर्थ हा मुलं कुठे आहेत तिथून शिकवायला सुरुवात झाली पाहिजे. विद्यार्थ्यांची लेखी अभिव्यक्ती आणि बेसिक गणित याची चाचपणी करून तिथपासून शिकवायला सुरुवात केली पाहिजे."
नवोदय विद्यालय घेणार नाही 15 मे रोजी पूर्वनियोजित सहावीची प्रवेश परीक्षा
जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navodaya Vidyalaya) इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा 15 मे 2021 च्या पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार नाही. मिझोराम, नागालॅंड आणि मेघालय वगळता देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मे महिन्याच्या मध्यात होणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीमध्ये प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेत असलेल्या नवोदय विद्यालय समितीने (NVS)ने navodaya.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार एनव्हीएस वर्ग सहावीची प्रवेश परीक्षा 2021 ही प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षेच्या तारखेची घोषणा परीक्षेच्या तारखेच्या 15 दिवस आधी केली जाईल नवोदय विद्यालय समितीने एनव्हीएस वर्ग सहावीची प्रवेश 2021 चाचणी पुढे ढकलल्याने परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली नाही. तथापि, विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्याच्या उद्देशाने समितीने जाहीर केले, की वर्ग सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा नवीन तारखेच्या किमान 15 दिवस आधी जाहीर केली जाईल.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काराजनगी यांच्या मार्फत....
💫 कोविड -१९ साथीच्या रोगाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल हा ऑनलाईन बघण्याची सुविधा दिनांक -: १ मे २०२१ वार -: शनिवार रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे तरी खाली दिलेल्या विद्यार्थ्याच्या नावाला टच करून त्या संबंधित निकाल विद्यार्थ्यांनी बघायचा आहे...
मुले
मुली
काही अडचण वाटल्यास अथवा शंका असल्यास संपर्क करा .
वर्गशिक्षक : श्री. रियाज रजाक आतार
९९२२१४८७३२
(सूचना: हा अंतिम निकाल नसून यात तांत्रिक कारणाने त्रुटी असू शकतात. शाळा सुरु झाल्यावर आपणास प्रत्यक्ष गुणपत्रक देण्यात येतील.)
सदर निकाल हा online अध्यापन ,स्वाध्याय , गृहभेटी , यामध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावर दिलेला आहे
🙏🙏🙏🙏🙏
१ ते १० वी सर्व इयत्तांचे व विषयांचे प्रत्येक घटकांचे शैक्षणिक व्हिडीओ एकाच ठिकाणी पहा. ज्या ईयत्तेचे व्हिडीओ पाहायचे असतील त्या इयत्तेच्या...